मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /कुत्रे भुंकत असतात, हत्ती थाटात चालतो, इंदोरीकर महाराजांनी केलं निलेश लंकेंचं कौतुक

कुत्रे भुंकत असतात, हत्ती थाटात चालतो, इंदोरीकर महाराजांनी केलं निलेश लंकेंचं कौतुक


जर लंके यांनी कोविड सेंटर उभारलं नसतं तर गरीबांचे हाल झाले असते. बेडचा खर्च बाजूला, हॉस्पिटलचा खर्च वेगळा आला असता.

जर लंके यांनी कोविड सेंटर उभारलं नसतं तर गरीबांचे हाल झाले असते. बेडचा खर्च बाजूला, हॉस्पिटलचा खर्च वेगळा आला असता.

जर लंके यांनी कोविड सेंटर उभारलं नसतं तर गरीबांचे हाल झाले असते. बेडचा खर्च बाजूला, हॉस्पिटलचा खर्च वेगळा आला असता.

अहमदनगर, 22 ऑगस्ट : अहमदनगर (ahmednagar) जिल्ह्यातील पारनेर (parner) तालुक्यातील तहसीलदार ज्योती देवरे (joyati devere case) यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके ( Nilesh Lanke) हे वादाच्या भोवऱ्यात सापडले असताना कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (indurikar maharaj) यांनी लंके यांचे तोंड भरून कौतुक केलंय. 'कितीही कुत्री भुंकली तरी हत्ती चालत राहतो. तुम्ही विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत चला असा सल्लाही इंदोरीकर यांनी दिला.

आमदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून भाळवनी येथे शरद पवार यांच्या नावाने कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. सध्या तिथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये कीर्तन करण्यासाठी इंदोरीकर महाराज यांना आमंत्रित करण्यात आले होते.

यावेळी कीर्तनातून समाज प्रबोधन करतानाचा इंदोरीकर यांनी लंके यांच्या कामाचे कौतुक केले. 'या कोविड सेंटरमधून बरा झालेला प्रत्येक रुग्ण आणि त्याचे नातेवाईक लंके यांना आशीर्वाद देत आहे' असं ही महाराज आपल्या कीर्तनात म्हणाले.

'हत्ती चालत असताना कुत्री भूंकत असतात, पण हत्ती थाटात चालत असतो. हत्तीचं काम कसं असतं हे लंके यांच्याकडून शिकलं पाहिजे. हत्ती गावात आला असेल हे ओळखायचं असेल ना,  कुत्री भुंकली पाहिजे, कुत्री भूंकली नाही तर हा अपमान आहे, हत्तीने फक्त डोलात चाललं पाहिजे, त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही पाहिजे, असंही इंदोरीकर महाराज म्हणाले.

जर लंके यांनी कोविड सेंटर उभारलं नसतं तर गरीबांचे हाल झाले असते. बेडचा खर्च बाजूला, हॉस्पिटलचा खर्च वेगळा आला असता. लोकांनी घरातील दागदागिने विकून हॉस्पिटलची बिलं भरली, असंही इंदोरीकर महाराज म्हणाले.

First published: