अहमदनगर, 13 जून : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजपचे नेते राम शिंदे (Ram Shinde) यांची शनिवारी कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे. मात्र, राम शिंदे यांनी ही फक्त अफवा असल्याचं सांगितलं आहे.
राज्यात एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपचे नेत्यांनी पुन्हा एकदा युतीची चर्चा सुरू केली आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्या गुप्त भेटीमुळे एकच खळबळ उडाला.
'कोणी रडलं तर...'; भावनिक WhatsApp स्टेटस ठेवून 21 वर्षीय तरुणाची आत्महत्या
शनिवारी दुपारी कर्जतमधील अंबालिका साखर कारखान्यावर अजित पवार आणि राम शिंदे यांची बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अशी कोणतीही चर्चा झालीच नसल्याचा दावा राम शिंदे यांनी केला आहे.
कर्जत जामखेड मतदार संघात माजी मंत्री भाजपचे नेते राम शिंदे यांचा पराभव करून अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार हे आमदार झाले आहेत. त्यामुळे शिंदे आणि पवार यांची भेट झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.
'मेरे साथ दो और साथी है' राऊतांनी केला मोदी-ठाकरेंच्या भेटीचा खुलासा
अजित पवार शनिवारी अंबालिका साखर कारखान्यावर आले होते आणि राम शिंदे हे देखील आपल्या मतदारसंघात होते. यावेळी ही भेट झाल्याचे बोलले जात होते, पण अशी कोणतीच भेट झाली नसल्याचे सांगून राम शिंदे यांनी चर्चेला पूर्णविराम दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.