मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी, जयंत पाटलांच्या दौऱ्याबद्दल कारवाईची सेना खासदाराची मागणी

शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी, जयंत पाटलांच्या दौऱ्याबद्दल कारवाईची सेना खासदाराची मागणी

जयंत पाटील यांनी शनिवारी अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत मंत्री बाळासाहेब थोरात आणि प्राजक्त तनपुरे होते.

जयंत पाटील यांनी शनिवारी अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत मंत्री बाळासाहेब थोरात आणि प्राजक्त तनपुरे होते.

जयंत पाटील यांनी शनिवारी अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत मंत्री बाळासाहेब थोरात आणि प्राजक्त तनपुरे होते.

अहमदनगर, 23 मे: राज्यावर कोरोनाचे (Maharashtra Corona cases) संकट ओढावलेले आहे, अशा परिस्थितीतही राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील  शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीमध्ये (NCP) वादाची ठिणगी पडली आहे.  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या दौऱ्यावरच शिवसेनेच्या खासदारांनी आक्षेप घेतल्यामुळे वादाला तोंड फुटले आहे.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अहमदनगर दौऱ्यावर शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी आक्षेप घेतला आहे. जयंत पाटील यांच्या दौऱ्यात जमाव बंदी आदेशात उल्लंघन झाल्याचं सांगत पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी केली आहे.

काँग्रेसच्या कार्यकर्त्याची अंत्ययात्रा काढल्यामुळे डॉक्टरांसह 200 जणांवर गुन्हा

जयंत पाटील यांनी शनिवारी अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत मंत्री बाळासाहेब थोरात आणि प्राजक्त तनपुरे होते. यात शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी डावलण्यात आलं होतं. या पाहणी दौऱ्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे लोखंडे यांनी कारवाईची मागणी केली आहे.

तर जयंत पाटील यांनी आपला हा दौरा सार्वजनिक नसल्याचं सांगितले. आपण फक्त बाळासाहेब थोरात आणि प्राजक्त तनपुरे यांना निळवंडे धरण्याच्या कामाची पाहणी संबंधी माहिती दिली होती. मात्र तिथे लोकं आपली गाऱ्हाणी घेऊन आली त्यांची निवेदन देखील उभ्या उभ्या घेतली, अशा लोकांना आपण रोखू शकत नाही', अस म्हटलं आहे. जयंत पाटील रात्री उशीरा आमदार निलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड केअर सेंटर ला भेट देण्यासाठी गेले होते.

जिल्हाधिकाऱ्याची दादागिरी: युवकाचा मोबाईल रस्त्यावर आदळून मारहाण, VIDEO VIRAL

'18 ते 45 वयोगटातील लोकांना कोरोना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र देशातील कोरोना लस उत्पादकांकडे केंद्र सरकारने सुरुवातील दुर्लक्ष केलं. स्फुटनिक ही एक लस चांगली आहे पण बाहेर देशातील कोरोना लशींना केंद्र सरकारने परवानगी दिली नाही. त्यामुळे सध्या हवी तेवढी लस देशातील राज्यांना मिळत नाही, असंही जयंत पाटील म्हणाले.

First published:

Tags: Jayant patil, NCP