मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /

नगरमध्ये जमिनीच्या वादातून दाम्पत्याला जबरी मारहाण; शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग

नगरमध्ये जमिनीच्या वादातून दाम्पत्याला जबरी मारहाण; शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग

Crime in Ahmednagar: पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या याठिकाणी जमीनीच्या वादातून एका दाम्पत्याला जबरी मारहाण (Couple beaten in land dispute)  करण्यात आली आहे. आरोपींनी पतीला वाचवण्यासाठी आलेल्या महिलेलाही धक्काबुक्की करत शिवीगाळ केली आहे.

पुढे वाचा ...
अहमदनगर, 02 जून: पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या याठिकाणी जमिनीच्या वादातून एका दाम्पत्याला जबरी मारहाण (Couple beaten in land dispute)  केल्याची घटना समोर आली आहे. नात्यातील काही लोकांनी आपल्या तरुण मुलांच्या मदतीने या दाम्पत्याला काठी आणि चपलेनं मारहाण केली आहे. संबंधित पीडित व्यक्ती खाली पडला असताना आरोपींनी त्याला अमानुष मारहाण करत शिवीगाळ (Beat and abuse) केली आहे. आपल्या पतीला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या पत्नीलाही आरोपींनी धक्काबुक्की करत शिवीगाळ केली आहे. या मारहाणीत दोघंही पती पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित मारहाण झालेल्या दाम्पत्याचं नावं बाबाजी तिकोने आणि पत्नी शारदा तिकोने असं आहे. तर मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव दिनकर तिकोने असून त्याने आपल्या कुटुंबातील मुलांच्या मदतीने या दाम्पत्याला अमानुष मारहाण केली आहे. आरोपी आणि पीडित दाम्पत्यांमध्ये मागील काही दिवसांपासून जमीनाचा वाद होता. यातून अनेकदा त्यांच्यात खटके उडाले आहेत. पण यावेळी मात्र आरोपीने आपल्या पीडित दाम्पत्याला आपल्या मुलांच्या मदतीने अमानुष मारहाण केली आहे. शेजारी राहणाऱ्या अन्य एका व्यक्तीने या घटनेचा सर्व व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे. हे ही वाचा-सराफा खून प्रकरण: ही कितवी बायको आहे? एका प्रश्नानं उलगडलं दुसऱ्या हत्येचं रहस्य या व्हिडीओमध्ये संबंधित आरोपी पीडित दाम्पत्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहे. यावेळी आरोपींनी जखमी व्यक्तीच्या पत्नीला लज्जास्पद शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. याप्रकरणी पीडित दाम्पत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पण पोलीस प्रशासनाकडून आरोपींवर अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. सर्व आरोपी मोकाट फिरत आहेत.
First published:

Tags: Ahmednagar, Beating retreat, Crime news

पुढील बातम्या