Home /News /ahmednagar /

'आम्ही भिकारी आहोत का, बांगड्या भरलेल्या नाहीत...'; मराठा आरक्षण मुद्द्यावरून नितीन राऊत आक्रमक

'आम्ही भिकारी आहोत का, बांगड्या भरलेल्या नाहीत...'; मराठा आरक्षण मुद्द्यावरून नितीन राऊत आक्रमक

मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अशीच आमचीही भूमिका आहे. मात्र, त्यांनीही मोठं मन दाखवलं पाहिजे. आमचं भांडवल करून स्वत:साठी त्यांनी लढू नये.

    अहमदनगर, 11 जून : आरक्षण विषयावरून काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज आक्रमक भूमिका (Nitin Raut Agressive) घेतली. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अशीच आमचीही भूमिका आहे. मात्र, त्यांनीही मोठं मन दाखवलं पाहिजे. आमचं भांडवल करून स्वत:साठी त्यांनी लढू नये. अन्यथा आम्ही बांगड्या भरल्या नाहीत किंवा आम्ही भिकारीही नाही आहोत, असे राऊत म्हणाले. राज्यघटनेने जे दिले आहे, तेच आम्ही मागत आहोत. आक्षणासंबंधी 21 जूनला न्यायालयाचा निकाल येणार आहे, त्यानंतर पाहून पुढील निर्णय घेतला जाईल,’ असंही ते म्हणाले. अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षण, मागसवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण यासंबंधी आपली भूमिका मांडली. मराठा समाजाच्या मागणीला आमचा पाठिंबाच आहे. पूर्वीच्या काळातील मराठ्यांची अवस्था व आताची अवस्था यात खूप फरक झालेला आहे. मराठा समाजातही गरीबी वाढली आहे. मुलांच्या शिक्षणाचेही प्रश्‍न आहेत. त्यामुळे त्यांनासुद्धा आरक्षणाच्या सवलती मिळाल्या पाहिजे, असं आमचं मत आहे. पण त्यांनी आम्हाला वेठीस धरू नये. आमचं भांड़वल करू नये. तेच काम करू शकतात व आम्ही काम करू शकत नाही, अशी भूमिकाही मराठ्यांनी घेऊ नये, असे राऊत म्हणाले. हे वाचा - हुश्श! ‘वाईट काळ संपला’; कोरोनाबाबत भारतीय तज्ज्ञाने दिली पॉझिटिव्ह न्यूज पदोन्नतीमधील आरक्षणावरून वाद राज्य सरकारनं 7 मे रोजी पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याची अधिसूचना काढली होती. मात्र, हा निर्णय घेताना मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणासाठी राज्य मंत्रिमंडळाने तयार केलेल्या उपसमितीला विश्वासात घेण्यात आलं नाही. त्यामुळं अनेकांनी रोष व्यक्त केला होता.पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याबाबतचा ७ मे रोजीचा राज्य सरकारचा जीआर रद्द झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असेही ते म्हणाले. वीज बिलवसुली बंद कधी होती? करोना काळात नागरिकांना त्रास होऊ नये, गर्दी होऊ देऊ नये, संसर्ग वाढू नये अशा सूचना दिल्या होत्या. वीज जर वापरली असेल तर त्याचे पैसे दिलेच पाहिजे. करोना काळातील वीजबिल माफी वा सवलतीच्या विषयावर निर्णय घेऊ शकत नाही. त्याही कंपन्या आहेत, त्यांना कर्ज आहे, कोळसा घ्यावा लागतो, स्वखर्चाने त्या चालतात, असे नितीन राऊत वीज बील वसुलीबाबत बोलताना म्हणाले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maratha reservation, Nitin raut

    पुढील बातम्या