मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /

वाईन विक्री निर्णयाविरोधात Anna Hazare आक्रमक; "तुमच्या राज्यात जगायची मला इच्छा नाही, माझा निरोप सरकारपर्यंत पोहोचवा"

वाईन विक्री निर्णयाविरोधात Anna Hazare आक्रमक; "तुमच्या राज्यात जगायची मला इच्छा नाही, माझा निरोप सरकारपर्यंत पोहोचवा"

ज्येष्ठ समाजेवक अण्णा हजारे यांनी वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ज्येष्ठ समाजेवक अण्णा हजारे यांनी वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ज्येष्ठ समाजेवक अण्णा हजारे यांनी वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

अहमदनगर, 13 फेब्रुवारी : राज्यातील सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या (Wine sale) विरोधात अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तसेच 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही सरकारला दिला. त्यानंतर सरकारच्या वतीने अण्णांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू असून राज्य उत्पादन शुल्क च्या सचिव वंदना कृष्णा यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. या सचिवांकडून अण्णा हजारे यांना लेखी पत्र देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने हा कायदा राबवणे आणि जनतेतून हरकती मागवल्या जातील असं आश्वासन दिले आहे. यावर मी 50% समाधानी असल्याचं मत अण्णांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर आज अण्णा हजारे यांनी ग्रामसभेत भाषण करताना राज्य सरकारवर (Maharashtra Government) जोरदार हल्लाबोल केला. मला तुमच्या राज्यात जगायचं नाहीये अण्णा हजारे यांनी म्हटलं, तुम्ही वाईन का आणता... आणि अशा प्रकारे खुल्या बाजारात तुम्ही विक्री करायला ठेवताय. म्हणून मला तुमच्या राज्यात जगायचं नाहीये. हा प्रश्न राळेगणचा नाहिये तर राज्याचा आहे. अरे वाईन की काय आपली संस्कृती आहे का? आयुष्य बरबाद करायला निघालेत. म्हणून जगायची इच्छा होत नाही. झाले 84 वर्षे खूप झाले. अशा प्रकारचा निर्णय सरकार घेत आहे. वाचा : शिवसेनेने ठरवली तारीख-वेळ,भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देणार, गौप्यस्फोट करणार? जनतेने जर परवानगी दिली तर... काल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सचिव आल्या होत्या भेटायला. मी त्यांना सांगितलं, तुम्हाला हा निर्णय घ्यायचाच होता तुम्हाला तर तुम्ही आधी जनतेचं मत विचारात घ्यायला हवं होतं. त्यांनी सांगितलं, तुमच्या मताप्रमाणे आम्ही वाईन विक्रीचा जो काही निर्णय जनतेला विचारल्याशिवाय घेणार नाही. मी त्यांना सांगितलं, मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय जनतेसमोर ठेवा आणि जनतेने जर परवानगी दिली तर तुम्ही विचार करा, नाहीतर नाही. रद्द करा. लोकशाहीत जनता प्रमुख आहे. अण्णा हजारे उपोषण करणार? सचिवांनी लेखी पत्र दिलं की, यापुढे आम्ही जो निर्णय घेऊ तो नागरिकांना विचारुन घेऊ, ही लोकशाही आहे. शेवटी आपण ग्रामसभेची मान्यता घेतो. मी जो निर्णय घेतला होता की, उद्यापासून उपोषण करण्याचा निर्णय घेतला. म्हणून मी वेळोवेळी जनतेच्या हितासाठी, समाजाची सेवा करत राहणार आहे. असे हे निर्णय झाले तर काय होईल या मुलांचा असा माझ्या समोर प्रश्न आहे. सरकारने आश्वासन दिलं आहे की, आम्ही जनतेला विचारल्या शिवाय निर्णय घेणार नाही. मला ग्रामसभेला विचारायचं आहे की, सरकारने लेखी दिलं आहे की आम्ही वाईन विक्रीचा निर्णय जनतेला विचारल्या शिवाय घेणार नाही. आता मला ग्रामसभेला विचारायचं आहे की, उद्याचं माझं उपोषण होणार आहे हे तुम्हाला मान्य नसेल तर हात वर करुन सांगा तुम्हाला माझं उपोषण मान्य नाही. अण्णा हजारेंचं वय पाहता राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांनी त्यांना उपोषण न करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचाच भाग म्हणून आज अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीमध्ये घेतलेल्या ग्रामसभेत सर्वांनी हात वर करुन अण्णा हजारेंना उपोषण न करण्याची विनंती केली. त्यानंतर अण्णा हजारे यांनी उपोषण न करण्याचा निर्णय घेतला.
First published:

Tags: Ahmednagar, Anna hazare

पुढील बातम्या