'तहसीलदारांची बदली करा अन्यथा आमची बदली करा' ज्योती देवरे यांच्या विरोधात तलाठी संघटना आक्रमक

'तहसीलदारांची बदली करा अन्यथा आमची बदली करा' ज्योती देवरे यांच्या विरोधात तलाठी संघटना आक्रमक

ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती.

  • Share this:

अहमदनगर, 25 ऑगस्ट : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे (Tahsildar Jyoti Deore) यांची ऑडिओ क्लिप व्हायरल (Jyoti Deore audio clip viral) झाल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये ज्योती देवरे या आत्महत्येचा इशारा दिला होता. या प्रकरणात आता नवी अपडेट समोर आली आहे. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात पारनेर तालुका महसूल कर्मचारी आणि तलाठी संघटनेच्यावतीने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू झाले आहे.

एक तर तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली करा, नाहीतर आमची बदली करा अशी मागणी संघटनेने केली आहे. पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके आणि पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्यामधील वाद शांत होत नाही तोच महसूल कर्मचारी आणि तलाठी संघटनेने तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे ज्योती देवरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे या त्यांच्याविरोधात त्या दडपशाही आणि हुकूमशाही करत असल्याची तक्रार दोन्ही संघटनांनी वरिष्ठांकडे केली होती. एक वर्ष होऊनही कुठलीही कारवाई न झाल्याने शेवटी आज संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्यांवर निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल

ज्योती देवरे यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील चौकशी अहवाल अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी 6 ऑगस्टला तयार करुन नाशिकच्या विभागीय आयुक्तांना पाठवला होता. या अहवालामुळे ज्योती देवरे यांनी ही ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याचं बोललं जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालात म्हटलं आहे की, शासकीय कामात नितांत सचोटी व कर्तव्य परायणता ठेवलेली नाही, कामाची जबाबदारी नीटपणे पार पाडलेली नाही. वरिष्ठांच्या आदेशाचा भंग केला आहे.

Published by: Sunil Desale
First published: August 25, 2021, 1:09 PM IST

ताज्या बातम्या