अहमदनगर, 3 जून: राज्यात आजही हुंड्यासाठी महिलांचा छळ होत असल्याच्या घटना घडत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव (Kopargoan, Ahmednagar) येथे हुंड्यासाठी महिलेचा मानसिक आणि शारीरिक छळ (Mental and physical abuse of woman for dowry) झाल्याची धक्कादायक घटना घडली असून पीडित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. माहेरून फर्निचर दुकानासाठी दोन लाख रुपये आणावे यासाठी विवाहितेचा मानसिक आणि शाररीक छळ केल्या प्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी (Kopargoan rural police) पती, सासू, सासरा आणि दिर यांचे विरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे.
21 वर्षीय विवाहितेचा मृतदेह कोपरगाव तालुक्यातील पढेगाव शिवारात एका विहिरीत आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली. मृत्यू संशयास्पद असल्याने मयतेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला. तसेच आरोपींनाही अटक केली आहे.
सोबत दारु प्यायल्यानंतर मित्राचीच हत्या, वादानंतर फावड्याच्या दांड्याने मारत घेतला जीव
कोपरगाव तालुक्यातील पढेगाव शिवारात 21 वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडालीय. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पूजा हिचा पढेगाव येथील सागर मापारी याचेशी 5 महिन्यांपुर्वीच विवाह झाला होता. सुखी संसाराच स्वप्न पाहात असलेल्या पुजाचा विवाहानंतर अवघ्या काही दिवसातच शारीरिक आणि मानसिक छळ होवू लागला. सासरकडून पैशाचे सतत तगादे होत असल्याचा आरोप मयत पुजा हिच्या वडिलांनी केला आहे.
या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरुन कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी पीडित महिलेचा पती सागर मापारी, सासू संगिता मापारी, सासरा भिमराज मापारी आणि दिर विशाल मापारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटकही केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Crime