मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /

तहसीलदार ज्योती देवरे ऑडिओ क्लिप प्रकरण, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले महत्त्वाचे आदेश

तहसीलदार ज्योती देवरे ऑडिओ क्लिप प्रकरण, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले महत्त्वाचे आदेश

अहमदनगरमधील तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता या प्रकरणी महत्त्वाची अपडेट आली आहे.

अहमदनगरमधील तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता या प्रकरणी महत्त्वाची अपडेट आली आहे.

अहमदनगरमधील तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता या प्रकरणी महत्त्वाची अपडेट आली आहे.

अहमदनगर, 21 ऑगस्ट : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे (Tahsildar Jyoti Deore) यांची ऑडिओ क्लिप व्हायरल (Audio clip viral) झाली आणि जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात यामुळे खळबळ उडाली. या प्रकरणी आता महत्त्वाची अपडेट आली आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिपद्वारे आत्महत्येचा इशारा दिला होता. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale) यांनी चौकशी समिती नेमली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी चौकशी समिती नेमली असून या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या चौकशी समितीच्या उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मल या अध्यक्ष असून उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील आणि तहसीलदार वैशाली आव्हाड या सदस्य आहेत. फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र ज्योती देवरे ऑडिओ क्लिप प्रकरणी राज्याते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं, "ज्योती देवरे यांनी 11 मिनिटांची एक ऑडिओ क्लिप जारी करुन अनेक गंभीर आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींवर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केले आहेत. लसीकरणावरुन काही कर्मचाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर मारहाण करणे, अश्लील शिवीगाळ करणे, महिला कर्मचाऱ्यांना मारण्यासाठी महिला पोलिसांना बोलविण्यास सांगणे, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षकांपर्यंत प्रकरण नेल्यानंतर देवरे यांच्याच बदनामीचा प्रयत्न करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही त्यांना धमक्या प्राप्त झाल्या आहेत. कोरोना काळात नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करत असताना त्यातही अडचणी उत्पन्न करणे आणि मग थेट मंत्र्यांकडे त्यांच्या बदलीची शिफारस करणे, यातून महिला अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करण्याच प्रकार घडला आहे. महिला अधिकाळ्याला आत्महत्येचा इशारा द्यावा लागत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आणि मनला वेदना देणारी आहे. आपल्याला विनंती आहे की, आपण यात तत्काळ लक्ष घालून हस्तक्षेप करावा." थेट दीपाली चव्हाण प्रकरणाचा उल्लेख करून मी सुद्धा तुझ्याकडे येतेय, हा त्यांचा ऑडिओमधील आवाज अंगावर शहारे आणणारा आहे. एक स्त्री अधिकारी आपले कर्तव्य पार पाडत असताना संपूर्ण यंत्रणाच तिचे मानसिक खच्चीकरण करीत असेल आणि परिणामी त्या महिला अधिकार्‍याला आत्महत्येचा इशारा द्यावा लागत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आणि मनाला वेदना देणारी आहे. खरे तर कोरोना काळात संपूर्ण यंत्रणा दबावात काम करीत असताना त्यांना आणखी नाहक त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाणे अतिशय आवश्यक आहे. माझी आपल्याला विनंती आहे की, आपण यात तत्काळ लक्ष घालून हस्तक्षेप करावा. या महिला अधिकार्‍याला आपण स्वत: बोलावून घेऊन त्यांची तक्रार ऐकून घ्यावी आणि त्यांच्या व्यथा समजून घ्याव्यात आणि तत्काळ त्यावर तोडगा काढून त्या अधिकार्‍याला न्याय द्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या महिला अधिकार्‍याची इतकी अवहेलना होऊ नये, हीच कळकळीची विनंती, असेही देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे.
First published:

Tags: Ahmednagar, Crime

पुढील बातम्या