Home /News /ahmednagar /

नगरमध्ये राजकारणाची बदली दिशा, काँग्रेसने केली मोठी मागणी

नगरमध्ये राजकारणाची बदली दिशा, काँग्रेसने केली मोठी मागणी

काँग्रेसचे नगरसेवक बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार आहे. थोरात यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करणार आहे.

    अहमदनगर, 25 मे : अहमदनगर महानगरपालिकेमध्ये (ahmednagar municipal corporation) महापौरपदासाठी (mayor election) आता महाविकास आघाडीमध्ये (MVA Goverment) रस्सीखेच सुरू झाली आहे. जातीयवादी पक्षाला बाजूला सारून काँग्रेसच्या उमेदवाराला महापौरपद द्यावे, अशी मागणी काँग्रेसने (Congress) केली आहे. काँग्रेसचे नेते लवकरच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची भेट घेणार आहे. अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदासाठी काँग्रेसकडून शीला चव्हाण यांचं नाव समोर आले आहे. त्यांच्या नावाचा ठराव सुद्धा मंजूर करण्यात आला आहे. त्यांनाच महापौरपद देण्यात यावे, अशी मागणी केली असल्याची माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दैनिक लोकसत्ताला दिली आहे. 'तुझ्या पुतण्यानं आमच्या मुलीला पळवलं'; जालन्यात महिलेचा विनयभंग करत केली मारहाण महापालिका स्थापन झाल्यापासून आतापर्यंत फक्त एकदाच काँग्रेसला महापौरपदाची संधी मिळाली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी अनेक वेळा महापौरपद आपल्याकडे राखले आहे. आता महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे यावेळी महापौरपद हे काँग्रेसला देण्यात यावे, अशी मागणी काळे यांनी केली. विशेष म्हणजे, महापौरपद हे अनुसूचित जाती (महिला) साठी राखीव आहे, त्यामुळे नगरसेविका शीला चव्हाण यांच्या उमेदवारीचा ठराव मांडण्यात आला आहे. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशीच बायको फरार, ब्यूटी पार्लरच्या बहाण्यानं हातावर तुरी नगर महापालिकेत पक्षीय बलाबल पाहिले तर काँग्रेसचे एकूण पाच नगरसेवक आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं प्रत्येकी तीनवेळा महापौरपद आपल्याकडे राखले होते. फक्त एकदाच महापौरपद काँग्रेसकडे गेलं होतं. नगर पालिकेत सर्वाधिक नगरसेवक हे शिवसेनेचे आहे. त्यामुळे सेनेचा महापौर होणार हे स्पष्ट आहे. पण, काँग्रेसला संधी मिळावी, अशी मागणी काँग्रेसच्या गोटातून होत आहे. लवकरच काँग्रेसचे नगरसेवक हे काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार आहे. थोरात यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करणार आहे. त्यामुळे संख्याबळ असूनही महाविकास आघाडीचा धर्म पाळत शिवसेना महापौरपद काँग्रेसला देते का, हे पाहण्याचे ठरणार आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Balasaheb thorat, Congress, काँग्रेस, महापौर

    पुढील बातम्या