अहमदनगर, 30 जून : अहमदनगर महानगरपालिकेत (ahmednagar mayor election) महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. शिवसेनेचा (shivsena) महापौर तर राष्ट्रवादीचा उपमहापौर अशी निवडणूक आज होणार आहे. पण या पार्श्वभूमीवर रात्री शिवसेनेच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. निलेश भांगरे (nilesh bhangare) या नगरसेवकाच्या पतीला मारहाण झाल्या आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे कार्यकर्ते अनिल शिंदे आणि संभाजी कदम यांनी मारहाण केल्या आरोप निलेश भांगरे केला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्यावर आरोप झाले आहेत त्या दोघांनाच्याही पत्नी या पूर्वी महापौर होत्या.
निलेश भांगरे यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये 'मुख्यमंत्र्यांच्या दारात मी माघार घेतली होती. मला जातीवरून शिव्या देऊन मारहाण केली. अनिल शिंदे आणि संभाजी कदम यांनी आपल्याला दिवसभर दारू पाजली. आमच्यात बोलणं सुरू असताना वाद झाला होता. त्यामुळे या दोघांनी मला बेदम मारहाण केली', असं निलेश भांगरे यांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं.
राहुल द्रविडला श्रीलंकेने दिला त्रास, कोच होताच परतफेड करणार!
अहमदनगरचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांच्यासमोर ही घटना घडली, त्यांनाही धक्काबुक्की झाल्याचा झाल्याची चर्चा होती. मात्र मला धक्काबुक्की झाली नाही, असे त्यांनी सांगितले आहे. मात्र, नगरसेवकाच्या पतिला मारहाण केली असून या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सध्या तरी गुन्हा दाखल झालेला नाही. आज ऑनलाईन पद्धतीने महापौर आणि उपमहापौर यांची निवडणूक होणार आहे.त्याआधीच या राड्यामुळे नगरमध्ये खळबळ उडाली आहे.
नगरपदाच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र
दरम्यान, नगर पालिकेत भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर स्थानिक पातळीवरही राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येण्याची भूमिका घेतली. नगरमध्ये तिन्ही पक्षांनी एकमेकांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नगरमध्ये महापौरपदाची निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचा निर्णय झाला आहे.
HBD: वजन कमी करत सर्वांनाचं दिला होता धक्का;अविका गोरचा अनोखा किस्सा
नगर पालिकेत विद्यमान महापौरांचा कार्यकाळ 30 जून रोजी संपणार आहे. त्यामुळे 30 जून रोजी सकाळी महापौर निवडणुकीसाठी 30 जूनला सकाळी 11 वाजता महापौर निवडणुकीची सभा होणार आहे. महापौरपद हे ‘अनुसूचित जाती महिला’ प्रवर्गाकरिता राखीव आहे. त्यामुळे महापौरपदी कोण विराजमान होणार हे पाहण्याचे ठरणार आहे.
नगर महापालिकेतील पक्षीय बलाबल (एकूण जागा 67)
शिवसेना- 23
राष्ट्रवादी -19
भाजप-15
काँग्रेस- 05
बसपा -04
अपक्ष -01
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.