मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /

Ahmednagar Crime: तरुणांचा धिंगाणा सहन न झाल्याने एकाची हत्या, रागाच्या भरात उचललं टोकाचं पाऊल

Ahmednagar Crime: तरुणांचा धिंगाणा सहन न झाल्याने एकाची हत्या, रागाच्या भरात उचललं टोकाचं पाऊल

Representative Image

Representative Image

Crime in Ahmednagar: माळरानावर एकत्र जमून धिंगाणा घातल्याच्या कारणावरून एका तरुणाची थेट हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

अहमदनगर, 26 मे: रागाच्या भरात ताबा सुटल्याच्या आणि त्यातून भयंकर कृत्य घडल्याच्या अनेक घटना समोर येतात. नगरमधून देखील अशीच एक घटना समोर आली आहे. माळरानावर एकत्र जमून धिंगाणा घातल्याच्या  कारणावरून एका तरुणाची थेट हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव उज्जैनी याठिकाणी ही घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) पाच जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

संबंधित हत्या झालेल्या तरुणाचं नाव शरद वाघ (Sharad Wagh Murder) असं असून तो नगर जिल्ह्यातील पिंपळगाव उज्जैनी येथील रहिवासी आहे. सोमवारी सायंकाळी मृत शरद आपल्या काही मित्रांसोबत पिंपळगावातील माळरानात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. याठिकाणी त्यांनी मोठ्या आवाजात धिंगाणा घालायला सुरुवात केली. बराच काळ सुरू असलेला धिंगाण्यावरून त्यांचा परिसरातील काही लोकांसोबत वाद झाला. या वादातून काही जणांनी शरद याची पोटात वार करून हत्या केली.

हे वाचा-Aurangabad Crime: मोठ्या आवाजात गाणं लावल्यानं झाला वाद; भांडणात तरुणानं चौघांना घेतला चावा

याप्रकरणी मृत तरुणाचे चुलते असणाऱ्या बाळासाहेब वाघ यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दाखल केली असून या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीसांनी मल्हारी ऊर्फ रघुनाथ बन्सी आल्हाट, सुभाष बन्सी आल्हाट, बन्सी भिवा आल्हाट, ऋषिकेश आल्हाट आणि मारिया आल्हाट अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून एमआयडीसी पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

First published:

Tags: Ahmednagar, Crime news, Murder