देव दर्शनासाठी जात असताना दोन भाऊ गेले पाण्यात वाहून, एकाला वाचवले

देव दर्शनासाठी जात असताना दोन भाऊ गेले पाण्यात वाहून, एकाला वाचवले

सुसरे येथील प्रदीप सुभाष डाके व आदित्य सुभाष डाके हे दोन भाऊ देवीच्या मंदीराकडे जात होते.

  • Share this:

अहमदनगर, 08 सप्टेंबर : अहमदनगर (ahmednagar) जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नद्यांना पूर (flood) आला आहे. पाथर्डी तालुक्यात पुराच्या पाण्यातून जात असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोन भावंडं पाण्यात वाहून गेली. यात एका मुलाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथील देवीच्या दर्शनासाठी नदीतून जाणारे दोन भावंडे पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात वाहुन गेली. त्यापैकी एकाला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. दुसरा भाऊ प्रदीप सुभाष डाके (वय १४ वर्षे रा. सुसरे) हा पाण्यात बुडुन मृत्यू पावला.

Shikhar Dhawan Update : पहिले बायको आणि आता....गब्बरला 24 तासात दोन धक्के

प्रदीपचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. त्याला तातडीने पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता मृत घोषित करण्यात आले. त्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला.

सुसरे येथील प्रदीप सुभाष डाके व आदित्य सुभाष डाके हे दोन भाऊ देवीच्या मंदीराकडे जात होते. नदी ओलांडताना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यावेळी आदित्य व प्रदीप पाण्यात वाहुन गेले. जवळच कपडे धुणाऱ्या महिलांनी आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले.

ठाण्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा, सेना-भाजपची सहमती

गावातीलच केशव बर्डे यांनी नदीच्या पाण्यात उडी घेवून आदित्य सुभाष डाके याला पाण्याच्या बाहेर काढले, त्याचा जिव वाचविला. मात्र, प्रदीप सुभाष डाके हा बुडालेल्या ठिकाणापासून तिनशे ते चारशे फुट अंतरावर पाण्यावर तरंगताना आढळून आला. पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  या घटनेमुळे सुसरे गावावर शोककळा पसरली आहे.

Published by: sachin Salve
First published: September 9, 2021, 12:04 AM IST

ताज्या बातम्या