Home /News /ahmednagar /

क्रीडाविश्व हादरलं! सराव संपताच सुरू झाला त्रास; क्रिकेटपटूचा हृदयद्रावक शेवट

क्रीडाविश्व हादरलं! सराव संपताच सुरू झाला त्रास; क्रिकेटपटूचा हृदयद्रावक शेवट

Cricket News: अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव शहरातील गजानन नगर याठिकाणी एका क्रिकेटपटूचा क्रिकेट सरावादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

    अहमदनगर, 11 डिसेंबर: अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या कोपरगाव शहरातील गजानन नगर याठिकाणी एका क्रिकेटपटूचा क्रिकेट सरावादरम्यान मृत्यू (Cricketer death) झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित तरुण गुरुवारी सायकांळी क्रिकेट ग्राउंडवर सीझन बॉलने सराव करण्यासाठी गेला होता. सराव झाल्यानंतर अचानक त्याच्या घशात त्रास व्हायला लागला. याची माहिती त्याने अन्य खेळाडूंना देताच, त्यांनी त्वरित संबंधित खेळाडूला रुग्णालयात हलवलं. पण उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. लोकेश अर्जुन ढोबळे असं मृत पावलेल्या 27 वर्षीय तरुणाचं नाव असून तो कोपरगाव शहरातील गजानन नगर येथील रहिवासी आहे. मृत लोकेश हा एक गुणी खेळाडू असून तो नेहमी शहरातील साई सिटी येथील क्रिकेट ग्राउंडवर क्रिकेटचा सराव करण्यासाठी जात असायचा. घटनेच्या दिवशी गुरुवारी देखील तो याठिकाणी क्रिकेट सराव करण्यासाठी गेला होता. याठिकाणी गेल्यानंतर त्याने नेहमीप्रमाणे सीझन बॉलने सराव केला. हेही वाचा-रोहित शर्मा विराटला देणार आणखी एक धक्का! कोहलीला चुकवावी लागणार मोठी 'किंमत'? पण सराव झाल्यानंतर अचानक त्याच्या घशात जळजळ करू लागलं. वेदना असह्य झाल्याने त्याने याची माहिती आपल्या मित्रांना दिली. त्यामुळे मित्रांनी प्राथमिक उपचारासाठी लोकेशला त्वरित एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. पण लोकेशची प्रकृती ढासळत असल्याने संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांनी लोकशला अन्य रुग्णालयात हलवण्यास सांगितलं. शहरातील अन्य दोन दवाखान्यात घेऊन गेलं असता, तेथे डॉक्टर नव्हते. हेही वाचा-भारताचा सगळ्यात यशस्वी कॅप्टन, पण विराटच्या करियरमध्ये झाले 5 मोठे वाद त्यामुळे शेवटी लोकेशला कोपरगाव येथील मानवता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. याठिकाणी उपचारादरम्यान लोकशची प्राणज्योत मालवली आहे. अशा पद्धतीने तरुणाचा अंत झाल्याने क्रीडाविश्वाला धक्का बसला आहे. तसेच गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ahmednagar, Crime, Death, Sport

    पुढील बातम्या