मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /

कोरोनाबाधित डॉक्टरला सुद्धा लुटले, नगरमध्ये 15 हॉस्पिटल्सकडून 1 कोटींची वसुली

कोरोनाबाधित डॉक्टरला सुद्धा लुटले, नगरमध्ये 15 हॉस्पिटल्सकडून 1 कोटींची वसुली

चौकशी समितीने 16 हॉस्पिटलमधील बिलांची चौकशी केली, असता 1 कोटी 12 लाख 66 हजार 192 रुपये  इतकी वसुली रक्कम प्रशासनाने काढली

चौकशी समितीने 16 हॉस्पिटलमधील बिलांची चौकशी केली, असता 1 कोटी 12 लाख 66 हजार 192 रुपये इतकी वसुली रक्कम प्रशासनाने काढली

चौकशी समितीने 16 हॉस्पिटलमधील बिलांची चौकशी केली, असता 1 कोटी 12 लाख 66 हजार 192 रुपये इतकी वसुली रक्कम प्रशासनाने काढली

अहमदनगर, 26 मे : कोरोनाने (Corona) राज्यात थैमान घातले आहे. अहमदनगर (Ahamadnagar) जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये, तर दुसरीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावात मात्र रुग्ण सेवा विसरून शहरातील सुमारे 15 हॉस्पिटल्सने (Hospital) रुग्णांना 1 कोटी 15 लाख लाखांची लूट केल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे. अंतरीम नोटीस देऊनही कुणीही प्रशासनाला दाद दिली नाही, प्रशासनाकडून कारवाई टाळाटाळ होत आहे त्यावर प्रशासनाने पुन्हा समिती नेमण्याचा निर्णय घेतला मात्र समिती झालीच नाही. तर यावर मनसे आक्रमक झाली आहे.

डॉक्टर विनायकुमार डावरे वय 82 यांना कोरोना झाला होता. त्यांना अहमदनगर येथे सुरभी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, त्या नंतर त्यांच्या पत्नीला ही याच काळात कोरोना झाला होता. त्यामुळे दोघांनाही सुरभीमध्ये दाखल करण्यात आले होते, त्यावेळी होणाऱ्या उपचार पद्धतीवर डावरे यांनी प्रश्न उपस्थित केला. जे उपचार केले जात होते ते सांगितले जात नव्हते, बिल आल्यावर मला धक्काच बसला, एक दिवसाला त्यांच्या बिलात 5 ppe kit वापरले होते, दोघांसाठी 10 ppe kit वापले होते, फूड आणि वॉटर चार्जेस लावले होते. या बाबत डॉ डावरे यांनी राजेश टोपे यांच्याकडे तक्रार केली होती.

ऑनलाइन डेटिंग करणाऱ्याला भेटण्यासाठी 'ती' चक्क जेलपर्यंत पोहोचली...

या बाबत तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी चौकशी समिती नेमली होती, त्यामध्ये प्रशासनाकडे 1040 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये चौकशी समितीने 16 हॉस्पिटलमधील बिलांची चौकशी केली, असता 1 कोटी 12 लाख 66 हजार 192 रुपये  इतकी वसुली रक्कम प्रशासनाने काढली. त्यात सर्वाधिक जास्त रक्कम ही सुरभी हॉस्पिटलची 33,75, 410 रुपये इतकी आहे. याचं हॉस्पिटलने प्रतिदिन 5 ppe kit वापरले आहेत.

ऑफ कॅमेरा बोलतांनी आम्ही सर्व हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांना ppe kit वापरले त्याची सरासरी हे ppe किट आहे, अशी बाजू सुरभी हॉस्पिटलने मांडली आणि शासनाचे आदेश नंतर प्राप्त झाले आहे. त्या मुळे ही वसुली चुकीची आहे, असे सुरभि हॉस्पिटल प्रशासन म्हणाले.

या बाबत जिल्हा प्रशासनाने पुन्हा चौकशी समिती नेमली आहे. पुन्हा एकदा चौकशी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी सांगितलं.

कोरोना महामारीच्या काळात अनेकजण बेरोजगार झालेले असून आजारापेक्षा अनेक आर्थिक संकटानेच आजारी पडलेल्याच्या घटना जिल्ह्यात अनेक घडलेल्या आहेत. आज अखेरपर्यंत जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या 69  हजाराच्या गेली आहे.  सुमारे 1 हजार 48 जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या 1 हजार 26 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

कोरोना रुग्णासोबत असताना...; कोरोना योद्धा डॉक्टरचा काळीज पिळवटून टाकणारा अनुभव

जास्त बिले घेतल्याची ही रक्कम फारच कमी आहे, प्रशासनाने अनेकदा नोटिसा देऊनही सर्व बिले दिलेली नाही, राजकीय वरदहस्त असल्यामुळे काही डॉक्टर प्रशासनाचे ऐकायला तयार नाही, त्यात अहमदनगर महानगरपालिकेचे अधिकारी यांचे हॉस्पिटल बरोबर हितसंबंध असल्याने ते जिल्हा प्रशासनाला ऐकत नाही,जिल्हातील सर्व बिलाची चौकशी करण्याची मागणी मनसेने केली आहे तर जिल्हा प्रशासनाने हॉस्पिटला पाठीशी घातले तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

First published: