Home /News /agriculture /

अखेर मोदी सरकारने गव्हाच्या निर्यातबंदीचे नियम केले शिथिल; काय होणार परिणाम?

अखेर मोदी सरकारने गव्हाच्या निर्यातबंदीचे नियम केले शिथिल; काय होणार परिणाम?

सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यानंतर जगभरात अन्नटंचाई उद्भवण्याचा धोका निर्माण झाला होता. नेमका काय निर्णय झाला आहे?

  नवी दिल्ली, 17  मे :  केंद्रातील नरेंद्र मोदी (naredra modi) सरकारने गव्हाच्या निर्यातबंदीमध्ये (Wheat export ban) शिथिलता जाहीर केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे निर्यातदारांना काहीसा मिळणार आहे. गेल्या आठवड्यात वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि उष्णतेमुळे (heat wave) घटलेले उत्पादन लक्षात घेऊन सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यानंतर इजिप्त सरकारनेही (Egypt government) निर्यातीत काही प्रमाणात सवलत देण्याची विनंती केली होती. सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या गव्हाच्या खेपेची कागदपत्रे  सीमा शुल्क विभागाकडे तपासणीसाठी सुपूर्द केली आहेत आणि 13 मे किंवा त्यापूर्वी सिस्टीममध्ये नोंदवण्यात आली आहेत गव्हाला निर्यात करण्यास परवानगी दिली जाईल असे सरकारकडून सांगण्यात आले.

  वित्त मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या सूचनेनुसार, सरकारने इजिप्तला जाणाऱ्या गव्हाच्या निर्यातीला परवानगी दिली आहे, फक्त कांडला बंदरावर पोहोचलेल्या गव्हाला फक्त परवानगी देण्यात आली आहे. इजिप्तला गहू निर्यातीत गुंतलेल्या कंपनीने 61,500 मेट्रिक टन गव्हाचे लोडिंग पूर्ण करण्याची विनंती केली होती. यापैकी 44,340 मेट्रिक टन गहू आधीच लोड केला गेला होता आणि फक्त 17,160 मेट्रिक टन गहू लोड करणे बाकी आहे. सरकारने 61,500 मेट्रिक टनांच्या संपूर्ण मालवाहतुकीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला असून कांडला ते इजिप्तला जाण्याची परवानगी दिली आहे.

  उपासमार वाढू शकते

  गेल्या वर्षी जागतिक गहू निर्यातीत भारताचा वाटा 4.1 टक्के होता. पण आता निर्यातीवरील बंदी हे जागतिक गव्हाच्या पुरवठ्याचे संकट आणखी गडद करण्यासाठी एक पाऊल ठरेल, असे सांगितले जात आहे. न्यू यॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार, भूकबळीने त्रस्त असलेल्या जगातील अनेक भागांवर याचा थेट परिणाम होईल.

  हे ही वाचा : शरद पवारांच्या गुगलीनंतर शिवसेनेचा 'दुसरा', संभाजीराजेंची राज्यसभेची वाट बिकट!

  युनायटेड नेशन्स बॉडी, वर्ल्ड फूड प्रोग्रॅमने इशारा दिला आहे की युद्धाच्या परिणामामुळे सध्याचे अन्न संकट अधिक बिघडेल आणि 4.7 कोटी लोक उपासमारीला बळी पडतील.

  भारत चीन सर्वात मोठा उत्पादक

  चीननंतर भारत हा जगातील सर्वात मोठा गहू उत्पादक देश आहे. परंतु, देशांतर्गत मागणी जास्त असल्यामुळे दोन्ही देश जगातील अव्वल गव्हाच्या निर्यातदारांमध्ये नाहीत. अनेक विकसनशील देशांमध्येही त्याचा परिणाम दिसून येत आहे आणि वाढत्या किमतीला विरोधही होत असल्याच्या बातम्या पाश्चात्य माध्यमांमध्ये येत आहेत. 

  यावेळी गहू निर्यातीचे उद्दिष्ट एक कोटी होते

  भारत सरकारने यावर्षी 10 लाख टन गहू निर्यात करण्याचे लक्ष्य ठेवले होते. गेल्या वर्षी भारताने विक्रमी गव्हाची निर्यात केली होती, मात्र यावेळी अचानक उष्मा वाढल्याने उत्पादनातील घसरण आणि किमतीत लक्षणीय वाढ झाल्याने सरकारला निर्यातीवर बंदी घालावी लागली. 

  सरकारने गहू खरेदी केली कमी

  कमी उत्पादन आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे गव्हाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. देशातही किमान आधारभूत किमतीपेक्षा भाव जास्त आहेत. यामुळेच यावेळी शेतकऱ्यांनी सरकारी यंत्रणांना गहू विकण्याऐवजी खुल्या बाजारात विकला. त्यामुळे शासकीय खरेदीत लक्षणीय घट झाली आहे. गतवर्षीच्या ४३.३० दशलक्ष टनांच्या तुलनेत यंदा केवळ १८ दशलक्ष टन खरेदी झाली आहे, तर सरकारचे उद्दिष्ट ४४.४ दशलक्ष टन होते.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Farmer, PM narendra modi, शेतकरी

  पुढील बातम्या