Home /News /agriculture /

E pik pahani : इ पीक पाहणी म्हणजे काय? शेतकऱ्यांना आपत्ती काळात याचा कसा होतो फायदा?

E pik pahani : इ पीक पाहणी म्हणजे काय? शेतकऱ्यांना आपत्ती काळात याचा कसा होतो फायदा?

आपत्ती काळात (disaster) मदत देताना बऱ्याच अडचणी आल्या यावर उपाय म्हणून सरकारने इ पीक पाहणी हे अॅप काढले. (E pik pahani)

  मुंबई, 19 मे : 2019 आणि 2021 या काळात शेतकऱ्यांना (farmer) आपत्ती मदत देताना बऱ्याच अडचणी आल्या. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्याने आपल्या शेतात कोणते पिक लावले आहे यामध्ये बऱ्याच शंका घेण्यात आल्या यामुळे आपत्ती काळात (disaster) मदत देताना बऱ्याच अडचणी आल्या यावर उपाय म्हणून सरकारने इ पीक पाहणी हे अॅप काढले. (E pik pahani)

  मागच्या वर्षी माझी शेती, माझा सातबारा, माझा पिकपेरा या घोषवाक्याचे आधारे शासनाने पीकपाणी करण्यासाठी गेल्या 15 ऑगस्टपासून सुरूवात केली. हा प्रकल्प संयुक्तपणे राज्याचा महसूल विभाग आणि कृषी विभाग यांच्या वतीने राबविण्यात येत आहे. सरकारच्या या प्रकल्पाला बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे.

  मोबाईलमध्ये इ पीक पाहणी ॲपद्वारे पिकपाणी नोंदवण्याची पद्धत

  सर्वप्रथम मोबाईल मधील google play store वर जाऊन e pik pahani हे ॲप डाऊनलोड करावे.

  पुढे खातेदार निवडा म्हणून सांगेल, ज्याच्या नावे जमीन आहे त्यांचं नाव टाकून खाली एक ओटीपी येतो तो टाकावा. यानंतर पिक पेरणीची माहिती सदरामध्ये तुमच्या जमिनीचा भूमापन क्रमांक /सनं/ गट क्रमांक निवडावा.

  जेव्हा तुम्ही तुमच्या गट क्रमांक निवडाल त्यावेळी तुमच्या जमिनीचे एकूण क्षेत्र  किती आहे व पोट खराब क्षेत्राबद्दल सर्व माहिती दाखवली जाईल.

  यानंतर तुमचा हंगाम कोणता आहे तो निवडावा लागेल खरीप किंवा संपूर्ण वर्षापैकी हंगाम निवडू  शकता.

  हे ही वाचा : रस्ता ओलांडणाऱ्या हरणाची दुचाकीला धडक; चालक उडून खाली पडला, अपघाताचा Live Video

  पिक पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र दर्शवली जाते. पिकांच्या वर्गामध्ये एक पिक पद्धती, मिश्र पीक, पॉलिहाऊस, शेडनेट हाऊस पिक,पडीत क्षेत्र  यापैकी योग्य पर्याय निवडावा.

  जमीन मिळकतीमध्ये निर्भेळ पिकांची नोंद करण्यापूर्वी जमिनीत कायम पड क्षेत्र असल्यास, पड जमिनी म्हणून नोंद करावी.

  हे ही वाचा : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; तिहेरी अपघातात रिक्षा आणि क्रूझरचा चक्काचूर, तिघांचा मृत्यू

  पिकांचा वर्ग निर्भेळ पीक निवड केल्यानंतर पिकाचा प्रकार, फळ व फळपीक पर्याय दिसतील. यापैकी योग्य तो पर्याय निवडावा.

  पीक पर्याय निवडून शेतातील पिकाचे नाव निवडून क्षेत्राची नोंदणी करावी. फळपीक पर्याय निवडल्यास फळझाडांची संख्या व क्षेत्र नमूद करायला.

  मिश्र पीक निवडल्यानंतर पिके आणि क्षेत्र नमूद करावे. मिश्र पिकाचे क्षेत्र नमूद करताना त्यातील घटक पिकानेव्यापलेल्या क्षेत्राच्या प्रमाणात वि

  चालू हंगामामध्ये जमीन शेत पिकाखाली येत नसल्यास किंवा लागवड केली नसल्यास अशावेळी चालू पडक्षेत्र निवड करावे.

  जल सिंचनाचे साधन पर्याय खाली पिकांना पाणी देण्यासाठी  ज्या सिंचन साधनांचा उपयोग करत आहात तो पर्याय निवडावा.

  त्यानंतर सिंचन पद्धत निवडायचे आहे.ठिबक सिंचन, तुषार सिंचन,प्रवाही सिंचन किंवा अन्य प्रकारे यापैकी एक पर्याय निवडणे अपेक्षित आहे.

  शेतकरी या ठिकाणी पिक पेरणी केलेला / लागवड केलेल्या पिकाचा दिनांक नमूद करतील.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Agriculture, Farmer

  पुढील बातम्या