Home /News /agriculture /

Agricultural Terminal : कृषी टर्मिनल म्हणजे काय? या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या मालाला येणार अच्छे दिन!

Agricultural Terminal : कृषी टर्मिनल म्हणजे काय? या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या मालाला येणार अच्छे दिन!

कृषि टर्मिनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी असणाऱ्या या प्रकल्पामुळे विकासाला गती मिळणार (Agricultural Terminal)

  नाशिक, 11 जून : नाशिक (Nashik) शहरात शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ मिळण्यासाठी कृषी टर्मिनलची (Agricultural Terminal) उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी 100 एकर जागेत याचे कामही चालू आहे. या कृषी टर्मिलनचा शेतकऱ्यांना (farmer) मोठा फायदा होणार आहे. दरम्यान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (minister chagan bhujbal) यांनी पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

  नाशिक शहरातील सय्यद पिंप्री येथे उभारण्यात येणाऱ्या नियोजित कृषि टर्मिनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी असणाऱ्या या प्रकल्पामुळे विकासाला गती मिळणार असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

  हे ही वाचा : "गनिमी कावा वापरत छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या आमदार मावळ्यांचे आभार" संभाजीराजे समर्थकांची सेना भवनासमोर बॅनरबाजी

  सय्यद पिंप्री येथील कृषी टर्मिनल प्रकल्पाच्या जागेची पाहणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. त्‍यावेळी त्यांनी सर्व्हे नं १६५४ मधील १०० एकर जागा या प्रकल्पाला लवकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

  यावेळी भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यातील उत्पादित शेतमालाला देशासह परदेशात मोठी मागणी आहे. हे कृषि टर्मिनल उभारल्याने शेतकऱ्याचा थेट बाजाराशी संपर्क प्रस्थापित करून उत्पादनाच्या विक्रीस पर्याय उपलब्ध करून देता येणार आहे. तसेच ओझर विमानतळ व राष्ट्रीय महामार्ग जवळ असल्याने दळणवळणाची सुविधाही उपलब्ध असणार आहे. कृषी टर्मिनल मार्केटमुळे शेतमाल आणि फलोत्पादनाच्या विक्रीच्या प्रचलित पद्धतीमुळे होणारे नुकसान कमी होण्यास मदत होणार आहे.

  हे ही वाचा : Petrol-Diesel Price: तेल कंपन्यांकडून इंधनाचे दर जारी, पेट्रोल-डिझेल किती रुपयांना विकलं जातंय?

  तसेच या कृषी टर्मिनल मार्केटमध्ये फळे आणि भाजीपाला, अन्नधान्य, पोल्ट्री, मास, दुग्धजन्य पदार्थांची व उत्पादनाची साठवणुक करता येणार असून या कृषि टर्मिनल मुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. या अनुषगंगाने आज या जागेची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी करून प्रकल्पाच्या कामाला गती देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

  कृषी टर्मिनल म्हणजे काय?

  देशासह राज्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाचे दळणवळण करण्यासाठी किंवा त्यांचे स्टोरेज करण्यासाठी कृषी टर्मिनल उभारण्याची गरज असते. या टर्मिनलचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत असतो. शेतकऱ्यांना याची मोठी बाजारपेठ मिळण्यासाठी कृषी टर्मिनल असणे आवश्यक आहे. यामुळे फळे आणि भाजीपाला, अन्नधान्य, पोल्ट्री, मास, दुग्धजन्य पदार्थांची व उत्पादनाची साठवणुक करता येते. कृषि टर्मिनल मुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आपला माल बाहेर विकता येणार आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Agriculture, Chagan bhujbal, Farmer, Nashik

  पुढील बातम्या