मराठी बातम्या /बातम्या /agriculture /

Onion Farming: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स, यामुळे उत्पन्नात होईल भरघोस वाढ

Onion Farming: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स, यामुळे उत्पन्नात होईल भरघोस वाढ

पावसाला सुरुवात झाली तर कांद्याचे व्यवस्थापन (Onion Management) कसे करायचे हा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न असतो. कारण कांद्यावर किडी व बुरशीजन्य रोगांचा धोका वाढत चालला आहे.

पावसाला सुरुवात झाली तर कांद्याचे व्यवस्थापन (Onion Management) कसे करायचे हा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न असतो. कारण कांद्यावर किडी व बुरशीजन्य रोगांचा धोका वाढत चालला आहे.

पावसाला सुरुवात झाली तर कांद्याचे व्यवस्थापन (Onion Management) कसे करायचे हा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न असतो. कारण कांद्यावर किडी व बुरशीजन्य रोगांचा धोका वाढत चालला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 10 डिसेंबर : राज्यात अवकाळी पाऊस (Untimely Rain) आणि हवामान बदलाचा सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे. फळ बागांचे अतोनात नुकसान झाले असून रब्बी हंगामातील कांदा पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. पेरणीपासून काढणीपर्यंतचे योग्य नियोजन केल्याने या नगदी पिकापासून शेतकऱ्यांना फायदा होतो. यंदा बदलत्या हवामानामुळे द्राक्ष, केळी, काजू, कांदा ही पिके करपून गेल्याने अनेकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली (Onion Farming) जात आहे.

पावसाला सुरुवात झाली तर कांद्याचे व्यवस्थापन (Onion Management) कसे करायचे हा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न असतो. कारण कांद्यावर किडी व बुरशीजन्य रोगांचा धोका वाढत चालला आहे. त्यानुसार नियोजन करून कांदा कसा वाचवावा, याबाबत कांदा उत्पादकांना सल्ला देण्यात आला आहे. याबाबत टीव्ही 9 ने माहिती दिली आहे.

कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या 5 टिप्स

1) शेतकर्‍यांनी फवारणीपूर्वी पावसाचा अंदाज घेणे आवश्यक आहे. फवारणीनंतर पाऊस झाल्यास शेतकर्‍यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाईल. याशिवाय पाऊस पडत असताना फवारणी करणे पिकांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कृषी शास्त्रज्ज्ञांचा सल्ला आहे की, पावसामुळे जमिनीत जास्त पाणी असल्याने कांद्यावर कीटकनाशकांचा कोणताही परिणाम होत नाही, त्यामुळे दोन दिवसांनी फवारणी केल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.

हे वाचा - Healthy Drink : मेथी-ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे, जाणून घ्या बनवण्याची पद्धत

2) कांदा पिकाला पेरणीपासून काढणीपर्यंत योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. कारण हे पीक अल्पकाळ टिकणारे असून रोग झाल्यास त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो, त्यामुळे बुरशीनाशकांचा वापर अनिवार्य असेल. परिसरात उपलब्ध द्रव बुरशीनाशके फायदेशीर ठरतील.

3) कृषी शास्त्रज्ञ रामेश्वर चांडक यांचे म्हणणे आहे की कांद्याच्या पेरणीनंतर दोन महिने अडॅक्सर हे बुरशीनाशक म्हणून वापरणे प्रभावी ठरेल.

हे वाचा - Protein rich foods: तुम्हाला माहीत आहे का? अंड्यापेक्षा जास्त प्रथिने या शाकाहारी पदार्थांमधून मिळतात

4) 15 लिटर पंपासाठी 30 मिली औषध पाण्यात मिसळावे लागते. हे मिश्रण एक एकरात फवारावे. त्यामुळे बीएसएफचे ऑपेरा ए बुरशीनाशक महत्त्वाचे ठरणार आहे.

5) औषधांचे प्रमाण योग्य असावे. परंतु, कांद्यावर झुलसा व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कीटकनाशके व बुरशीनाशकांची एकाचवेळी फवारणी करणे आवश्यक असते.

First published:

Tags: Agriculture, Onion