मुंबई, 13 मे : उन्हाळ्याच्या झळा (heat wave) जाणवू लागल्या की सर्वांनाच वेध लागतात ते मान्सून (monsoon) कधी दाखल होणार. सर्वात पहिल्यांदा बळीराजाला मान्सून वेध लागलेले असतात कारण जून महिना हा पेरणीचा हंगाम असतो यामुळे शेतकरी (farmer) आपल्या शेताची मशागत करून मान्सूनची वाट पाहत बसलेला असतो दरम्यान आता ही प्रतिक्षा संपणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार (imd report) मान्सून केरळमध्ये 27 मे ला दाखल होणार आहे. मागच्या 3 वर्षाच्या तुलनेत यंदा मान्सून आठवडाभर आधीच दाखल होणार आहे. (weather forecast)
मागच्या 3 वर्षांच्या तुलनेत मान्सून यंदा आठवडाभर लवकर येणार असल्याने पाऊस (rain) जास्त होण्याची शक्यता आहे. 2019 साली 6 जूनला मान्सून दाखल झाला होता, 2020 साली 5 जूनला तर 2021 साली 31 मे ला मान्सून दाखल झाला होता. यंदा मात्र मान्सून 4 दिवस आधीच दाखल होणार असल्याने पावसाचे सर्व रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : मोठी बातमी : पुणे रेल्वे स्थानकात बॉम्बसदृश्य वस्तू आढळली, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल
केरळमध्ये (keral) 27 मेपर्यंत पाऊस दाखल होईल तर तळकोकणात ते 2 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुखे कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदमानानवर आगामी पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होणार आहे. त्यानंतर अरबी समुद्रावर दुसऱ्या आठवड्यात पाऊस सुरू होईल आणि त्यानंतर भारतात पुढील आठवड्यात मान्सून दाखल होईल. (weather forecast)
केरळमध्ये 2022 च्या नैऋत्य मोसमी पावसाचा अंदाज: यावर्षी, केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन सामान्य तारखेच्या काही दिवस आधी होण्याची शक्यता आहे.
यावर्षी केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन 27 मे रोजी ± 4 दिवसांच्या मॉडेल त्रुटीसह होण्याची शक्यता आहे.IMD pic.twitter.com/0dK0gj41H6 — K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 13, 2022Some more info on onset of sw monsoon over Kerala since 2005. Actual onset and Forecasted dates... pic.twitter.com/DOefMVlLUB
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 13, 2022
मागच्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात सकाळच्या वेळेत तीव्र उष्णता जाणवत होती. ढगाळ वातावरण असल्याने उष्णतेच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असुनही कोणत्याही जिल्ह्यात अद्याप पाऊस झाला नाही.
राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता
गेल्या दोन दिवसांत पुण्याच्या कमाल तापमानामध्ये बदल झाला आहे. या महिन्यात पहिल्यांदाच ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात पुण्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर दिसून आला नाही. दुसरीकडे, महाराष्ट्रातील काही भागांत पुढील तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
10 ते 13 मे रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तर 13 मे रोजी पुणे, धुळे, जळगाव, नाशिक, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड आणि अहमदनगर या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय 11 ते 13 मे दरम्यान मुंबई, परभणी, कोल्हापूर आणि सातारा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weather, Weather forecast, Weather update, Weather warnings