नागपूर, 28 जानेवारी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पाचा सर्वाधिक परिणाम हा कृषी क्षेत्रावर होत असतो. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे कृषी क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येकाच्या नजरा लागलेल्या आहेत. विशेषतः विदर्भातील शेतकऱ्यांची सद्यःस्थिती बिकट असून दुष्काळ, शेतकरी आत्महत्या आणि शेतमालाला पुरेसा न मिळणारा हमीभाव यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर थेट परिणाम होईल, अशा काही घोषणा होण्याची मागणी शेतकरी करीत आहे.
सद्यःस्थिती बघता शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. नैसर्गिक आपत्ती, घटत उत्पन्न, कमी बाजारभावाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. या संकटाची सर्वाधिक झळ ही विदर्भातील शेतकऱ्यांना पोहचली आहे. पावसामुळे शेती मालाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक लाख हेक्टर कापूस व सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. ज्यामध्ये जवळपास 25 ते 30 % घट या ठिकाणी अपेक्षित होती. मात्र ती अधिक पुढे जाते की काय, अशी भीती वाटत आहे. धानाच्या बाबतीत देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विदर्भातील काही भागात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं.
नैसर्गिक संकटातून मोठं नुकसान
एकंदरीत विदर्भातील जे मुख्य पीक आहे त्यांचे नुकसान झाले आहे.आज जवळपास 7 लाख हेक्टर क्षेत्र विदर्भामध्ये भाताचे आहे. विदर्भातील शेतीचे आर्थिक गणित भात, कापूस, सोयाबीन, संत्रा पिकावर वर आहे मात्र या पिकांवर नैसर्गिक संकटांचा मोठा परिणाम झाला आहे. यामुळे उत्पन्न घटत असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
80C ची मुदत संपली तर अजून कोणत्या मार्गाने तुमचा कर वाचवू शकता? Video
आर्थिक स्थिती सुधारणे आवश्यक
विदर्भातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसते. विदर्भातील पीक पद्धती, येथील भागात असलेल्या सिंचनाच्या सोई, शेतीसाठी होणार अर्थपुरवठा, शेतमालासाठी उपलब्ध असलेली बाजारपेठ, शेतीशी संबंधित जोडधंदे आणि शासकीय मदत या गोष्टींशी शेतकरी जीवन निगडित असते. मात्र विदर्भात या सर्वच गोष्टीचा अभाव दिसतो. शेतकरी कर्जबाजारी होतात, नैराश्यात जातात यातून आत्महत्येचे प्रकार घडतात. त्यामुळे शासनाने शेतकरी आर्थिक दृष्ट्या भक्कम होईल. शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील याबाबत पावले उचलणे आवश्यक आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Budget 2023, Farmer, Local18, Nagpur, Nirmala Sitharaman