औरंगाबाद 28 जानेवारी : मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन कापूस आणि तुरीचं पीक घेतलं जातं मात्र या पिकांना भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या नुकसान होतं. आगामी आर्थिक बजेटमध्ये हे नुकसान टाळण्यासाठी काय तरतुदी कराव्यात याबाबत औरंगाबादचे शेतकरी नेते जयाजी सुर्यवंशी यांनी महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत.
शेतकरी कसा सुखी होणार?
मराठवाड्याला दुष्काळाचा नेहमीच चटका बसला आहे. या दुष्काळामुळे शेती तोट्यात जाते आणि काही शेतकरी टोकाचं पाऊल उचलतात. अवेळी पडणारा पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मराठवाड्याचा शेतकरी संकटात सापडलाय. मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन कापूस आणि तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलंय. पण, त्याला अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागत आहे.
हळद उत्पादक शेतकऱ्यांना खूशखबर मिळेल? काय आहेत व्यापाऱ्यांचे प्रश्न? पाहा Video
शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वाढलाय. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी लागणारे अवजार, ट्रॅक्टर, पाण्याची मोटर, पाईप लाईन आणि इतर साहित्यांवर असलेला जीएसटी पूर्ण कमी केला पाहिजे. जीएसटी कमी केल्यास शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि यातून त्यांना फायदा मिळेल, असं मत सुर्यवंशींनी व्यक्त केलंय.
मराठवाड्यासारख्या मागास भागात मोठ्या प्रमाणात सिंचनाची शेती केली जाते. केंद्र सरकारचे सिंचनाबाबतचे धोरण नक्की नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. सरकारने सोयाबीन, तुरीची डाळ कापूस, कापसाच्या बिया आयात करण्याचा निर्णय घेतला याचा परिणाम शेतकऱ्यांवर झाला आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागत आहे याबाबतही आर्थिक बजेटमध्ये तरतूद होणे अपेक्षित आहे, अशी मागणीही सूर्यवंशींनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Aurangabad, Budget 2023, Farmer, Local18