मराठी बातम्या /बातम्या /agriculture /

Tomato Rate: टोमॅटोचे भाव एका वर्षात तब्बल 50 टक्क्यांनी वाढले; गेल्या दोन महिन्यात 25 टक्क्यांची वाढ

Tomato Rate: टोमॅटोचे भाव एका वर्षात तब्बल 50 टक्क्यांनी वाढले; गेल्या दोन महिन्यात 25 टक्क्यांची वाढ

एका वर्षात बहुतांश राज्यांमध्ये टोमॅटोचे भाव (Tomato Rate) 50 टक्क्यांनी वाढले आहेत. लोकलसर्कल या डिजिटल कम्युनिटी बेस्ड प्लॅटफॉर्मनं नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात टोमॅटोच्या किमती गेल्या दोन महिन्यांत 25 टक्क्यांनी वाढल्याचं सांगितलंय.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : एका वर्षात बहुतांश राज्यांमध्ये टोमॅटोचे भाव (Tomato Rate) 50 टक्क्यांनी वाढले आहेत. लोकलसर्कल या डिजिटल कम्युनिटी बेस्ड प्लॅटफॉर्मनं नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात टोमॅटोच्या किमती गेल्या दोन महिन्यांत 25 टक्क्यांनी वाढल्याचं सांगितलंय. ज्या लोकांनी संघटित किरकोळ आणि ई-कॉमर्स वेबसाइट्सद्वारे टोमॅटो खरेदी केले होते, त्यांनी स्थानिक बाजारातून टोमॅटो खरेदी केलेल्या लोकांपेक्षा 10 ते 20 टक्के जास्त किंमत दिल्याचं या अभ्यासात दिसून आलंय.

टीव्ही 9 ने दिलेल्या बातमीनुसार, 2020 च्या तुलनेत यावर्षी बहुतेक घरांतून टोमॅटो खरेदीसाठी खर्च झालेली सरासरी रक्कम माहिती करून घेण्याचा या सर्वेक्षणाचा उद्देश होता. या सर्वेक्षणात 19 हजारांहून अधिक लोकांकडून माहिती घेतली. त्यापैकी 41 टक्के लोक टियर-1 शहरांतील आहेत. याशिवाय टियर-2 शहरांतील 33 टक्के आणि टियर-3 शहरे आणि ग्रामीण जिल्ह्यांतील 26 टक्के लोकांचा समावेश आहे.

बहुतांश लोकांनी टोमॅटो 60 रुपये किलोनं विकत घेतला

सरासरी, 10 हजार 25 लोकांपैकी 44 टक्के लोकांनी टोमॅटो खरेदी करण्यासाठी प्रति किलो 60 रुपयांपेक्षा जास्त पैसे दिल्याचं सांगितले. सुमारे 31 टक्के कुटुंबं टोमॅटो घेण्यासाठी 50 ते 59 रुपये मोजत असल्याचं समजलं. 23 टक्के लोकांनी टोमॅटोसाठी 60 ते 69 रुपये मोजावे लागत असल्याचं सांगितले. तर, 21 टक्के लोकांनी सांगितलं की त्यांनी 70 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीत टोमॅटो खरेदी केला. सर्वेक्षणात केवळ 8 टक्के लोकांनी 30-49 रुपयांत टोमॅटोची खरेदी केल्याचं सांगितलं.

हे वाचा - RD Interest rate : रिकरिंग डिपॉझिटवरील व्याज दर मोजण्यासाठी वापरा `हे` सूत्र

सप्टेंबर 2021 च्या लोकलसर्ल्सच्या (LocalCirlces) सर्वेक्षणात असं आढळून आलं की बहुतेक लोकांनी भारतात टोमॅटो खरेदी करण्यासाठी प्रति किलो 60 रुपये दिले आहेत. हाच दर दोन महिन्यांत 25 टक्क्यांनी वाढून 75 रुपये झालाय.

34 टक्के लोकांनी रिटेल आणि ई-कॉमर्सद्वारे केली टोमॅटो खरेदी

मोठ्या आणि टियर-1 शहरांमधील बहुतेक लोकांनी टोमॅटोला दिलेली किंमत 100 रुपये प्रति किलो होती. तर, टियर-2 आणि 3 शहरांमध्ये ते सरासरी 70 रुपये प्रति किलो होते. त्याच वेळी, लहान शहरे आणि ग्रामीण भागातील कुटुंबांनी प्रति किलो 50-60 रुपये दिले आहेत. सरासरी, 9 हजार 543 लोकांपैकी 34 टक्के लोकांनी संघटित रिटेल आणि ई-कॉमर्स चॅनेलद्वारे टोमॅटो खरेदी केले आहेत. तर 66 टक्के लोकांनी स्थानिक दुकानांतून टोमॅटो खरेदी केले आहेत.

हे वाचा - Sleep Disorders : तुम्हालाही झोपेत बडबडण्याची सवय आहे का? जीवनशैलीत असा बदल ठरेल गुणकारी

अहवालातील सरकारी आकडेवारीचा हवाला देत विविध कारणांमुळे किरकोळ बाजारात या नाशवंत भाज्यांच्या किमती वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दराने वाढल्या असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये पुरवठ्यातील व्यत्यय, व्यापार नियमनातील अडचण आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीला अनेक राज्यांमध्ये डिझेलच्या किमती 100 रुपयांच्या पुढे गेल्याचा समावेश आहे. देशभरात टोमॅटोच्या वाढत्या किमतींमुळे लोक नाराज झाले आहेत.

First published:

Tags: Tomato, Tomato rate