Home /News /agriculture /

Bhandara : थरारक! पावसात शेतातील वांगी भरताना अंगावर वीज पडून मजूराचा मृत्यू

Bhandara : थरारक! पावसात शेतातील वांगी भरताना अंगावर वीज पडून मजूराचा मृत्यू

शेतात वांगी (farmer) भरत असलेल्या मजूराच्या (laborer) अंगावर वीज पडून मृत्यू (Death by Lightning strikes) झाल्याची घटना भंडारा (bhandara) जिल्ह्याच्या मोहाडी (mohadi) तालुक्यातील बेटेखारी येथे घडली आहे.

  भंडारा, 2 जुलै : शेतात वांगी (farmer) भरत असलेल्या मजूराच्या (laborer) अंगावर वीज पडून मृत्यू (Death by Lightning strikes) झाल्याची घटना भंडारा (bhandara) जिल्ह्याच्या मोहाडी (mohadi) तालुक्यातील बेटेखारी येथे घडली आहे. दिनेश प्रभू सोनकर (वय 36) रा .जांब  असे मृतक मजूराचे नाव आहे. दिनेश रोजंदारीने शेतात काम करायला गेला होता. तोडलेले वांगी पोत्यात भरत असताना अचानक झालेल्या विजेच्या गडगडामध्ये (Lightning strikes) दिनेशच्या अंगावर अचानक वीज पडल्याने दिनेशचा जागीच मृत्यू  झाला. लागलीच याची माहिती मोहाडी पोलिसांना दिली असता पंचनामा करत मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृतक दिनेशच्या पश्चात त्याच्या मागे आई ,पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परीवार आहे. दरम्यान दिनेशच्या कुटूंबाला शासनाकडून आर्थिक मदत करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

  कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात मंगळवारी जोरदार सरींनी हजेरी लावली आहे. सिंधूदुर्ग, रायगड, जळगाव, पुणे, परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. तर घाटमाथ्यावरही पावसाचा काहीसा जोर दिसून आला. उर्वरित राज्यात मात्र ढगाळ हवामान, उन्हाचा चटका, हलक्या सरी असेच चित्र पाहायला मिळत आहे.

  हे ही वाचा :

  दरम्यान मागच्या 24 तासांत कोकणातील कुडाळ 60, रायगड, पेण येथे 50, दोडामार्ग, वसई, म्हसळा, कल्याण, माथेरान प्रत्येकी 40, डहाणू, पालघर, विक्रमगड, सुधागड, मुलदे, मालवण, मेखेडा, मंडणगड, वेंगुर्ला येथे प्रत्येकी 65

  मध्य महाराष्ट्र : धरणगाव 50, लोणावळा 40, नगर, गगनबावडा, एरंडोल प्रत्येकी 30, इगतपुरी, जेऊर, वडगाव मावळ, राधानगरी प्रत्येकी 20.

  मराठवाडा : परभणी 40, परांडा, भूम, खुलताबाद प्रत्येकी 30, देवणी, पूर्णा प्रत्येकी 20.

  घाटमाथा : कोयना (नवजा)70, अंबोली 50, लोणावळा 40, डुंगुरवाडी, ताम्हिणी, भिरा, धारावी प्रत्येकी 30 मिलीमीटर पाऊस झाला.

  हे ही वाचा :

  उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात मॉन्सूनची प्रगती

  नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) उत्तर भारतात प्रगती केली आहे. बुधवारी (ता. २९) संपूर्ण, बिहार, उत्तराखंडसह, हिमाचल प्रदेशचा बहुतांशी भाग, उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. उद्यापर्यंत (ता. 1) संपूर्ण अरबी समुद्र, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, दिल्लीसह, राजस्थान, जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाना, चंडीगडच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

  जोरदार पावसाचा इशारा

  ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे : रत्नागिरी, सिंधुदुर्ग. जोरदार पावसाचा इशारा

  यलो अलर्ट असलेले जिल्हे : कोकण : रायगड, ठाणे, मुंबई. • विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ.

  विजांसह पावसाचा इशारा : मराठवाडा : बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली. विदर्भ : अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Bhandara Gondiya, Cyclone, Rain fall

  पुढील बातम्या