Home /News /agriculture /

Lightning : वीज पडून वर्षाला 2 हजार 500 लोकांचा होतो मृत्यू, विजांसह पाऊस होताना 'या' गोष्टी पाळल्याच पाहिजेत

Lightning : वीज पडून वर्षाला 2 हजार 500 लोकांचा होतो मृत्यू, विजांसह पाऊस होताना 'या' गोष्टी पाळल्याच पाहिजेत

वीज पडणे (Lightning strike) ही नैसर्गिक घटना जगभरात सर्वच ठिकाणी होत असते. यामध्ये मनुष्य पशु आणि वित्त हानी (Financial loss) होत असते.

    मुंबई, 24 मे : वीज पडणे (Lightning) ही नैसर्गिक घटना जगभरात सर्वच ठिकाणी होत असते. यामध्ये मनुष्य पशु आणि वित्त हानी (Financial loss) होत असते. जगभरात तसेच भारतातसुद्धा वीज पडल्यामुळे मृत्युचे प्रमाण जास्त आहे. वीज पडण्यापूर्वी जेव्हा वातावरण निर्मिती होत असते अशा वेळी जर सुरक्षिततेच्या बाबींचे पालन केले तर अशा घटनांमुळे होणाऱ्या जीवित व वित्त हानीचे रक्षण करता येऊ शकते.

    एका सर्वेक्षणानुसार दरवर्षी सुमारे 2500 व्यक्तींचा मृत्यू वीज पडल्यामुळे (per year 25 thousand death of lightning) होत असतो. त्यामुळे वीज पडणे या घटनेला गांभीर्याने घेतले पाहिजे जेणेकरून मनुष्य पशु आणि वित्तहानीचे प्रमाण कमी करता येईल. ग्रामीण भागात वीज पडून होणारे मृत्यूचे प्रमाण हे शहरी भागापेक्षा जास्त आहे.

    हे ही वाचा : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून उमेदवार जाहीर, संजय पवार यांना उमेदवारी

     जर वीज पडली तर :

    तर तुमच्या आसपास अथवा कोणा व्यक्ती वर पडली तर ताबडतोब वैद्यकीय मदत मिळवा. बाधित व्यक्ती वर प्राथमिक उपचार करतांना या गोष्टींचा विचार करा.

    श्वासोच्छवास - जर थांबला असेल, तर त्या तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. त्यामुळे त्या व्यक्तीच्या नैसर्गिक श्वासोच्छवास सुरू होण्यास मदत होईल. हृदयाचे ठोके- थांबले असल्यास सीपीआर (CPR) चा उपयोग करावा.

    नाडीचा ठोका - चालू असेल आणि श्वासोच्छवास चालू असेल, तर इतर काही जखमा अंगावर भाजल्याच्या खुणा, हाडांच्या इजा हयाबाबत नोंद करा. दृष्टी ठीक आहे नाव ऐकू येत आहे ना व इतर हालचाली याची नोंद घ्या.

    विजांचा पाऊस सुरू असताना हे करा :

    तुम्ही घराबाहेर असाल, तर त्वरीत आसरा शोधा, इमारत हा सुरक्षित आसरा आहे. पण इमारत नसेल तर तुम्ही गुहा, खड्डा किंवा खिंडी सारख्या भागात आश्रय घ्या. झाडे यासाठी कधीच सुरक्षित नसतात. उंच झाडे विजेला स्वतः कडे आकर्षित करतात.

    तुम्हाला आसरा मिळाला नाही. तरी परिसरातील सर्वात उंच जागा टाळा. जर जवळपास फक्त उंच झाडे असतील, तर झाडाच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर यांचा जमिनीवर वाका किंवा वाकून बसा. घरातच राहा किंवा बाहेर असाल, तर घरी जा. जर वादळाची चाहूल लागली, तर अगदी गरजेचे नसेल तर बाहेर जाणे टाळा.

    लक्षात ठेवा. विजेचा प्रकाश आणि आवाज यातील अंतर जितके सेकंद असेल, त्याचा तीनने भागाकार केला असता ज्या ठिकाणी कोसळली तिथेपर्यंतचे अंतर किलोमोटरमध्ये अंदाजे कळू शकते.

    हे ही वाचा : बेळगावात ट्रक आणि खासगी बसमध्ये जोरदार धडक, 8 जणांचा मृत्यू तर 26 जखमी, मृतक कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील

    जेव्हा विजा चमकणे किंवा वादळ खूप जोरात चालू असेल तेव्हा विजेच्या सुवाहकांपासून दूर रहा. उदा. धुराडी, रेडिएटर्स, स्टोव्ह, धातूचेनळ असलेल्या जागा आणि टेलीफोन, पाण्यातून तात्काळ बाहेर या, छोटया नावेतून पाण्यातून जात असाल तर काठावर बाहेर या.

    जर तुम्हाला विद्युत भारित वाटत असेल, तुमचे केस उभे असतील किंवा त्वचेला मुंग्या येत असतील, तर तुमच्या वर विज कोसळण्याची शक्यता आहे. त्वरित जमिनीवर ओणवे व्हा किंवा गुडघ्यात मान घालून बसा.

    विजांचा पाऊस होतान हे करू नये

    विद्युत उपकरणे चालू करून वापरू नका. जसे की - हेअर ड्रायर, विद्युत टूथ ब्रश किंवा विद्युत रेझर, जर विज तुमच्या घरावर किंवा घराजवळ कोसळली, तर तुम्हाला विजेचा धक्का बसू शकतो.

    वादळात टेलिफोनचा वापर टाळा.विज टेलिफोनच्या घरावरील तारांमधुन वाहू शकते. बाहेर असतांना धातूच्या वस्तूंचा वापर टाळा. जर वीज ह्या तारांवर किंवा मनोऱ्यावर कोसळली, तर प्रवाह सुरक्षितपणे या तारातून जमिनीत या अशीच त्यांची रचना असते.

    Published by:Sandeep Shirguppe
    First published:

    Tags: Monsoon, Rain, Rain fall

    पुढील बातम्या