Home /News /agriculture /

Maharashtra farmers : ठाकरे सरकार शेतकऱ्यांना भाज्या, कडधान्यांचे 10 वाण मोफत देणार

Maharashtra farmers : ठाकरे सरकार शेतकऱ्यांना भाज्या, कडधान्यांचे 10 वाण मोफत देणार

महाराष्ट्रात शेतीला (Maharashtra farmers) अधिक महत्व दिले जाते कांदा, कापूस, ऊस, यासह अन्य उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे.

  मुंबई, 20 मे  : महाराष्ट्रात शेतीला (Maharashtra farmers) अधिक महत्व दिले जाते कांदा, कापूस, ऊस, यासह अन्य उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. राज्यात शेतीपुरक वातावरण असल्याने शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाकडून विविध सुविधा आणि मोफत योजना राबवल्या जातात दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray) यांनी राज्यातील खरीप हगांमाबाबत आढावा बैठक घेतली यामध्ये भारतात महाराष्ट्र हे शेतकरी बांधवांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणाऱ्या भाज्या, कडधान्यांचे दहा वाण मोफत देणारे, शेतकरी बांधवांच्या आरोग्याचा विचार करणारे महाराष्ट्र देशातले पहिले राज्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

  ते पुढे म्हणाले की, राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान आहे. राज्य शासनाने विकासाची पंचसूत्री स्वीकारली असून कृषी क्षेत्राला प्रथम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचे आवाहन करत यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच शेतकरी बांधवांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणाऱ्या भाज्या, कडधान्यांचे दहा वाण मोफत देणारे, शेतकरी बांधवांच्या आरोग्याचा विचार करणारे महाराष्ट्र देशातले पहिले राज्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (Maharashtra farmers)

  हे ही वाचा : heavy rain kolhapur : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी, संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत

  शेतकऱ्यांच्या पोषणावर विशेष लक्ष देणार

  मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ज्या राज्यात शेतकरी सुखी, ते राज्य सुखी. शेतकरी बांधव कष्ट करत असताना स्वत:च्या, कुटुंबाच्या आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणाऱ्या भाज्या, कडधान्यांचे दहा वाण राज्य शासन आता शेतकरी बांधवांना मोफत देणार आहे. शेतकरी बांधव आपल्या कुटुंबातले घटक आहेत. त्यामुळे यंत्रणेने आपुलकीने कुटुंबासारखे काम करावे. ‘विकेल ते पिकेल’ अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले पाहिजे. 

  रोग, कीडींचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी सतर्कता बाळगली पाहिजे. शेतमालाला हमी भाव आहे, पण हमखास भाव मिळाला पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

  हे ही वाचा : Alphonso export : कोकणच्या हापूसने अमेरिकेला लावलं वेड; पुण्यातून थेट White House मध्ये आंबा जाणार

  शेतकरी बांधवांसमोर पीक विम्याचा प्रश्न आहे. पीक विमा समाधानकारक नाही. केंद्राकडे याबाबत पाठपुरावा सुरू आहे. याबाबत केंद्र सरकार विचार करत आहे. यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. कृषी विभागाचे खरीप हंगामाचे नियोजन समाधानकारक आहे. त्यामुळे आपणा सर्वांच्या प्रयत्नाने, सहकार्याने यंदाचा खरीप हंगाम यशस्वी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

  खरीप हंगाम 2022 मध्ये प्रमुख अन्नधान्य पिकांचे 151.33 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली अपेक्षित आहे. खरीप हंगामात खोडमाशीच्या प्रादुर्भावाची शक्यता गृहीत धरून तिचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पुरेसा पाऊस होणार आहे. परंतु पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकरी बांधवांनी पेरणी करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत केले.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Farmer, Uddhav tahckeray, कांदा उत्पादक शेतकरी, शेतकरी

  पुढील बातम्या