Home /News /agriculture /

पिकांवर खतं-कीटनाशकं फवारणं झालं सोपं; औरंगाबादेतील शेतकऱ्याच्या मुलानं लढवली शक्कल

पिकांवर खतं-कीटनाशकं फवारणं झालं सोपं; औरंगाबादेतील शेतकऱ्याच्या मुलानं लढवली शक्कल

'निओ स्प्रे पंप' असं या फवारणी यंत्राचं नाव आहे. पिकांच्या चार ओळींमध्ये एकाच वेळी फवारणी करता येते. शेतीला लागणाऱ्या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत.

    औरंगाबाद, 19 जानेवारी : पिकांवर कीटकनाशक/खतं फवारणीसाठी शेतकऱ्यांना होणारा त्रास योगेश गावंडे पाहत होता. शेतकऱ्यांचं काम सोपं करण्याचा विचार करून अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असतानाच योगेशने असं फवारणी यंत्र बनवलं, ज्यामुळं शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य झालं. आता फवारणी यंत्र (Spray machines) हातानं चालवण्याची गरज नाही. तसंच, शेतात कमी वेळेत जास्त भागात फवारणी करता येते. गावंडे याने गेल्या चार वर्षांत देशातील 15 राज्यांत 400 हून अधिक मशिन्स शेतकऱ्यांना विकल्या आहेत. आता त्याची मागणी वाढत आहे. या यंत्रामुळं शेतकऱ्यांचा वेळ वाचत असून विषबाधा होण्याचा (Spray machines on crops) धोका नाही. शेतीसाठी आणखी काही प्रकारची मशीन तयार करण्याचा त्याचा मानस आहे. टीव्ही 9 ने दिलेल्या बातमीनुसार मशीनमधील दोन्ही चाकं आणि साखळीच्या साहाय्यानं फवारणी केली जाते, असं गावंडे यांनी सांगितलं. 'निओ स्प्रे पंप' असं या फवारणी यंत्राचं नाव आहे. पिकांच्या चार ओळींमध्ये एकाच वेळी फवारणी करता येते. शेतीला लागणाऱ्या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. पण त्याचा चांगला उपयोग कसा करायचा याची कल्पनाशक्ती आणि मेहनत हवी. मागील काही वर्षांत कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण वाढलं आहे. यासाठी राज्य आणि केंद्र सरकार कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करत आहे. जेणेकरून शेतकऱ्यांचं जीवन सुसह्य होईल. महाविद्यालयाच्या प्रकल्पासाठी स्प्रे पंप तयार करण्यात आला मराठवाडा विभागातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलानं विकसित केलेल्या स्वयंचलित फवारणी यंत्राची महाराष्ट्राच्या कृषी विश्वात चर्चा आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील चित्तेपिंपळे गावातील योगेश गावंडे यांनी हे उपकरण तयार केलं आहे. त्यामुळं फवारणीचे काम सोपे झालंय. हे वाचा - Budget 2022: कृषी क्षेत्राला प्रोत्साहन मिळणार, सरकार पीक कर्जाचं टार्गेट वाढवण्याची शक्यता एक कल्पना जी एक व्यवसाय बनली या मशीनची किंमत फक्त 3 हजार 800 रुपये होती. स्वयंचलित फवारणी यंत्राचा यशस्वी वापर केल्यानंतर त्यांनी या पथदर्शी प्रकल्पाला उद्योगात रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला. चिखलठाणा येथे शेड बांधून 4 वर्षात 400 स्वयंचलित फवारणी यंत्रं बनवली. या प्रकल्पाचा व्यवसाय सुमारे 20 लाख रुपयांचा होता. हे वाचा - Dragon Fruit फळाची शेती करा, कमी खर्चात होईल व्हाल मालामाल! महाराष्ट्रात द्राक्षं, आंबा, केळी, डाळिंब, कांदा, सोयाबीन आणि कापूस या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. या सर्व प्रकारात शेतकऱ्यांना फवारणी करण्यात अडचणी येत असतात. त्या दूर करण्याचा प्रयत्न या शेतकऱ्याच्या मुलानं केला आहे. सोयाबीन, कापूस या पिकांमध्ये फवारणी करणं या यंत्रामुळं जास्तीत जास्त सोपं होणार आहे. आता युरियाचीही फवारणी करावी लागणार आहे. कारण हे खत आता द्रव स्वरूपात आलं आहे. यासाठीही या यंत्राचा शेतकऱ्यांना मोठा उपयोग होऊ शकतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Agriculture

    पुढील बातम्या