Home /News /agriculture /

Kolhapur flood : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधितांना घरे बांधण्यासाठी ठाकरे सरकारकडून कोट्यवधींचा निधी मंजूर

Kolhapur flood : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधितांना घरे बांधण्यासाठी ठाकरे सरकारकडून कोट्यवधींचा निधी मंजूर

कोल्हापूर जिल्ह्याच्या (Kolhapur flood) करवीर तालुक्यातील अनेक गावांना 1989 आणि 2019 मधील महापूरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना घर बांधण्याकरिता निधी मिळणार आहे.

  मुंबई, 03 जून : कोल्हापूर जिल्ह्याच्या (Kolhapur flood) करवीर तालुक्यातील मौजे चिखली, शिंगणापूर, वळीवडे या गावातील 1989 आणि 2019 मधील महापूरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना घर बांधण्याकरिता 95 हजार 100 रुपये आणि अंशत: पडझड झालेल्या घरांसाठी 6 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. (Kolhapur flood affected families) यासाठी राज्य शासनाने 1 कोटी 56 लक्ष 42 हजार 300 रूपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.

  कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील मौजे चिखली, शिंगणापूर, वळीवडे या गावातील 1989 साली महापुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. परंतू पुनवर्सन गावठाणात न जाता मूळ गावठाणात काही कुटुंबीय वास्तव्य करीत आहेत. जुलै-ऑगस्ट, 2019 मधील अतिवृष्टी पूरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावठाणातील घरपडझडीमुळे पूर पुनर्वसन गावठाणात वाटप केलेल्या जमिनीवर घराचे बांधकाम करण्याच्या अटीवर 95 हजार 100 रूपये प्रत्येक कुटुंबाला अनुदान आणि अंशत: पडझड झालेल्या घरांसाठी 6 हजार रूपये प्रति कुटुंब इतके अनुदान दिले जाणार आहे. 

  हे ही वाचा : Chandrapur Farmers : 'या' जिल्ह्यातीत शेतकऱ्यांचा नादच खुळा, 5 कंपन्यांची स्थापना करत ठरले role model

  दि. 08 जुलै 2020 व 12 मे 2021 च्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयात 1 कोटी 56 लक्ष 42 हजार 300 रूपये इतका निधी विभागीय आयुक्त, पुणे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्याकडे देण्यात आला आहे.

  1) ज्या बाधितांनी पूर पुनर्वसन गावठाणात वाटप केलेले भूखंडाची विक्री केलेली आहे ते वगळता पूर्णत: पडझड झालेल्या ज्या भूखंडधारकांनी वाटप केलेल्या भूखंडावर अद्याप घर बांधकाम केलेले नाही अशा 153 बाधित कुटुंबांना त्यांना वाटप केलेल्या भूखंडावर घराचे बांधकाम करण्याच्या अटीवर 95 हजार 100 रूपये प्रति कुटुंब इतक्या मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.

  हे ही वाचा : Sugarcane Farmer : ठाकरे सरकारला जाग येणार का? शेतकरी आत्महत्या करतोय तरीही ऊस शेतातच, अद्यापही लाखो टन ऊस गाळपाविना

  2) ज्या बाधितांनी पूर पुनर्वसन गावठाणात वाटप केलेले भूखंडाची विक्री केलेली आहे ते वगळून अंशतः घर पडझड झालेल्या बाधित कुटुंबांपैकी ज्यांनी पुनर्वसन गावठाणात वाटप केलेल्या भूखंडांवर बांधकाम केलेले नाही अशा 182 बाधित कुटुंबांना त्यांना वाटप केलेल्या भूखंडावर घराचे बांधकाम करण्याच्या अटीवर 6 हजार रूपये प्रति कुटुंब इतक्या मदतीचे वाटप करण्यात येईल.

  3) बाधित झालेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी ज्यांना नवीन गावठाणात भूखंड वाटप केले होते. या भूखंडाची त्यांनी विक्री केली आहे. अशा 48 कुटुंबांना नवीन गावठाणात पुनर्वसनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून  जमीन विक्री तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा कुटुंबांनी त्यानुसार नवीन जमीन यापूर्वी खरेदी केली असल्यास अथवा चालू आर्थिक वर्षात जमीन खरेदी केल्यानंतरच त्यांना मूळ गावठणातील त्यांच्या पूर्णतः पडझड झालेल्या घरांसाठी SDRF च्या निकषाप्रमाणे अनुक्रमे 95 हजार 100 व 6 हजार प्रमाणे नवीन जागेवर घर बांधून स्थलांतरीत होतील या अटीवर मदत देण्यात येणार आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Kolhapur, Rain in kolhapur

  पुढील बातम्या