Home /News /agriculture /

Chana Crop : केंद्राच्या ‘या’ निर्णयामुळे राज्यातील हरभरा उत्पादकांचा जीव टांगणीला

Chana Crop : केंद्राच्या ‘या’ निर्णयामुळे राज्यातील हरभरा उत्पादकांचा जीव टांगणीला

केंद्राच्या आणि राज्याच्या समन्वयाच्या अभावाचा नेहमीच फटका शेतकऱ्यांना बसत आला आहे. दरम्यान राज्यातील हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. (chana crop farmer)

  मुंबई, 26 मे : केंद्राने अचानक किमान आधारभूत दराने हरभरा खरेदी बंद (central government Stop buying chana) केल्याने राज्यातील हरभरा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. हरभरा (Chana Crop) खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने अचानक केंद्राकडून हरभरा खरेदी करण्याचे थांबवण्यात आले आहे. यामुळे चांगल्या प्रतीचा हरभरा बाजार विकण्यासाठी गेल्यास हमीभावापेक्षा कमी दरात विक्री होत असल्याने शेतकऱ्यांची द्विदा अवस्था झाली आहे. (chana crop farmer) दरम्यान केंद्राकडून हरभरा उत्पादकांना पुन्हा एकदा हरभरा खरेदी सुरू होण्याची प्रतीक्षा लागली. (harbhara market)

  याबाबत अजित पवार (ajit pawar) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की या हंगामात हरभऱ्याच्या एकरी उत्पादनात वाढ झाली असून 32.83 लाख मे. टन अपेक्षित उत्पादन असताना 8.20 लाख मे. टन एवढे वाढीव उत्पादन होत आहे. यामुळे हरभऱ्याची खरेदी 28 जून 2022 पर्यंत वाढविण्यासाठी केंद्र शासनाला विनंती करण्यात आली असून त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे. हरभऱ्याच्या खरेदीचा अंतिम दिनांक 29 मे 2022 असून ही तारीख वाढविण्यास एक-दोन दिवसात मंजूरी अपेक्षित आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

  परभणी राज्यात किमान पाच हजार २३० रुपये प्रतिक्विंटल या किमान आधारभूत दराने हरभरा खरेदी प्रक्रिया सुरू होती. 23मे रोजी दुपारी अचानक उद्दिष्टपूर्ती झाल्याचे कारण पुढे करत पोर्टलवर ऑनलाइन खरेदीची नोंदणी बंद झाली.

  हे ही वाचा : Vidarbha rain update : विदर्भात हवामान खात्याकडून yellow alert, या जिल्ह्यांनाही सतर्कतेचा इशारा

  त्यामुळे काही केंद्रांवर खरेदी केलेल्या मात्र पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी न केलेल्या हरभन्यासह ज्या शेतकऱ्यांना खरेदीसाठीचे एसएमएस पाठविले, परंतु त्यांची खरेदी बाकी होती अशा हजारो शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला किमान आधारभूत दर मिळण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजारात किमान आधारभूत दरापेक्षा अत्यंत कमी दर मिळत असल्याने शासन ही परवड थांबविण्यासाठी तत्पर पुढाकार घेईल का, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

  चार जिल्ह्यांत सहा लाख 36 हजार क्विंटल खरेदी

  मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद व लातूर या चार जिल्ह्यांत 45 हजार 273 शेतकऱ्यांकडील सहा लाख 36 हजार 4 क्विंटल हरभऱ्याची किमान आधारभूत दराने खरेदी करण्यात आली. या चारही जिल्ह्यांत 54 हजार 199 शेतकऱ्यांनी आपला हरभरा आधारभूत दराने खरेदी केला जावा म्हणून ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी 52 हजार 48 शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठीचे एसएमएस पाठविण्यात आले होते. तर जवळपास 2 हजार 151 शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठीचे एसएमएस पाठविणे बाकी होते. या शेतकऱ्यांसह जवळपास 6 हजारांवर शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करणे बाकी असल्याची माहिती समोर आली आहे.

  हरभऱ्याची खरेदी 28 जून पर्यंत वाढविण्यासाठी पाठपुरावा सुरु

  सध्या हरभऱ्याचे बाजारभाव 4500-4800 रुपये प्रती क्विंटल आहे.  गेल्या हंगामात हरभऱ्याच्या लागवडीखालील क्षेत्र 22.31 लाख हेक्टर व एकूण उत्पादन 23.97 लाख मे. टन इतके होते.  सध्या सरासरी एकरी उत्पादन 1158 क्विंटल प्रती हेक्टर असे आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Agriculture, Farmer

  पुढील बातम्या