Home /News /agriculture /

राज्यात रेशीम शेतीचं क्षेत्र वाढतंय; कोषांना 68,500 रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी भाव

राज्यात रेशीम शेतीचं क्षेत्र वाढतंय; कोषांना 68,500 रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी भाव

सध्या कोल्हापूरसह (Kolhapur Silk farming) इतर जिल्ह्यांमध्ये रेशीम शेतीचं (Silk farming) क्षेत्र वाढत आहे. त्यासाठी रेशीम संचालनालयही विशेष प्रयत्न करत आहे. त्यामुळंच आता राज्यात 15 हजार 795 एकरावर तुतीची लागवड झाली आहे.

    मुंबई, 04 फेब्रुवारी : शेतीच्या पारंपरिक पद्धती बदलल्याशिवाय उत्पादनात वाढ होत नाही, हे शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागलंय. आता हवामान बदलामुळं (Climate Change) पीक पद्धतीत बदल होत असले तरी अजूनही काही जिल्ह्यांमध्ये शेतकरी फार मोठे बदल करण्याची हिंमत करत नाहीत. सध्या कोल्हापूरसह (Kolhapur Silk farming) इतर जिल्ह्यांमध्ये रेशीम शेतीचं (Silk farming) क्षेत्र वाढत आहे. त्यासाठी रेशीम संचालनालयही विशेष प्रयत्न करत आहे. त्यामुळंच आता राज्यात 15 हजार 795 एकरावर तुतीची लागवड झाली आहे. यापैकी एकट्या औरंगाबाद (Aurangabad Silk farming) जिल्ह्यात 8 हजार 928 एकरावर तुतीची लागवड होते. त्यामुळं महाराष्ट्रात विक्रमी उत्पादनात मराठवाड्याचा मोठा वाटा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषांना 68,500 रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी दर मिळालाय. विशेष म्हणजे आता रेशीम किड्यांची नवीन आवक सुरू झाली आहे. या रेशीम निधीचा सौदा बाजार समितीचे सभापती सुभाषसिंग राजपूत यांनी केला आहे. राज्यात रेशीम लागवडीचं क्षेत्र वाढत असल्यानं संचालनालयामार्फत बाजारपेठही उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे वाचा - Business: कमी खर्चात करा औषधी वनस्पस्तींची शेती; होईल लाखोंची कमाई लागवडीबरोबरच बाजारपेठेतही वाढ झाली तुती लागवडीबाबत सकारात्मकता निर्माण झाला आहेच; शिवाय, उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात रेशीम संचालनालयानंही महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्यामुळं बीड, जालना यांसारख्या जिल्ह्यांमध्ये बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. परिणामी वाहतूक खर्च वाचू शकतो आणि वाजवी दर मिळत असल्यानं रेशमी कापडाची मागणीही वाढत आहे. सध्या रेशीम किडयाचा भाव 65 ते 900 रुपये प्रतिकिलो आहे. त्यामुळं शेतकर्‍यांची आर्थिक प्रगती झाली आहे आणि महाराष्ट्रानं यात नवीन उच्चांक गाठला आहे. हे वाचा - Strawberry Farming: स्ट्रॉबेरीची शेती कशी आणि केव्हा करावी? कृषि वैज्ञानिकांनी दिल्या 5 बेस्ट टिप्स हे कसं सुरू झालं? शेतकऱ्यांमध्ये तुती लागवडीला प्रोत्साहन मिळावं यासाठी प्रशासनानं महारेशीम मोहीम सुरू केली. त्यादरम्यान रेशीम संचालनालयाकडून शेतकऱ्यांना लागवडीपासून काढणी व विपणनापर्यंत मार्गदर्शन करण्यात आलं. त्यामुळं त्याचं क्षेत्र वाढलं आणि आता जिल्ह्यात बाजार समितीची स्थापना झाली आहे. मराठवाड्यात रेशीम किड्यांची आवक सुरू झाली आहे. मराठवाड्यात 55 ते 90 रुपये प्रतिकिलो दरानं रेशीम कोष उपलब्ध आहेत. जयसिंगपूरमध्ये 68,500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. शिवाय, ही तर केवळ सुरुवात आहे आणि याचे दर आणखी वाढणं अपेक्षित आहे. पुढे भविष्यात दर आणखी वाढतील. रेशीम कोषांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर एक नवा पर्याय येत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Agriculture, Business News

    पुढील बातम्या