Home /News /agriculture /

Agricultural Education : ठाकरे सरकारचा कृषी शिक्षणावर भर; ‘या’ जिल्ह्यासाठी 490 कोटीं खर्चून देणार सर्वाधिक संधी

Agricultural Education : ठाकरे सरकारचा कृषी शिक्षणावर भर; ‘या’ जिल्ह्यासाठी 490 कोटीं खर्चून देणार सर्वाधिक संधी

नाशिक येथे कृषी विज्ञान संकुलात कृषी महाविद्यालय, (Agricultural Education) उद्यानविद्या महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय ही तीन महाविद्यालये सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली.

  नाशिक, 07 जून : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मौजे काष्टी, (Mahatma Phule Agricultural University Rahuri) ता. मालेगाव जि. नाशिक येथे कृषी विज्ञान संकुलात कृषी महाविद्यालय, (Agricultural Education) उद्यानविद्या महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय ही तीन महाविद्यालये सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली. दरम्यान या संकुलामुळे नाशिक जिल्ह्यात (Nashik district) एकाच ठिकाणी कृषी शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध होणार आहे. या महाविद्यालयांच्या बांधणीसाठी तब्बल 490 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याने मंत्रीमडळाकडून याला मान्यता मिळाली आहे.

  नाशिकमध्ये सुरू होणाऱ्या कृषी महाविद्यालय व उद्यान विद्या महाविद्यालयामध्ये 60 जणांना प्रवेश मिळणार आहे. तर याचा अभ्यासक्रम 4 वर्षांचा असणार आहे. तसेच कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाची प्रवेश क्षमता 40 विद्यार्थ्यांची असून अभ्यासक्रमाचा कालावधी 4 वर्षांचा आहे.  या महाविद्यालयांला बांधण्यासाठी अंदाजे 490 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

  हे ही वाचा : Monsoon Update : मान्सून कर्नाटकात दाखल तर महाराष्ट्रात येणार कधी? विदर्भात Heat Wave कायम

  मौजे काष्टी येथे कृषी विज्ञान संकुल निर्मितीस तसेच कृषी महाविद्यालय, उद्यान विद्या विद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय ही पाच महाविद्यालये सुरु करण्यासाठी 2020 साली मंजूरी मिळाली होती. यातील 2020-21 पासून कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, 2020-21 पासून अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय सुरु झाले आहे. उर्वरित तीन महाविद्यालये यंदाच्या सालापासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

  कृषी विज्ञान संकुलांतर्गत कृषी शिक्षणाबरोबरच कृषी पूरक उद्योग विकास, प्रक्रिया केंद्र, शेतकरी प्रशिक्षण केंद्र व सुविधा केंद्र, आदर्श रोपवाटिका संकुल, सर्व कृषी निविष्ठांचे संशोधन आणि निर्माण केंद्र असे विविध कृषी विषयक उपक्रम विकसित करण्याचे नियोजन आहे. या संकुलामुळे नाशिक जिल्ह्यात एकाच ठिकाणी कृषी शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत.

  हे ही वाचा : Nashik leopard attack: घराच्या आवारात बसलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला, पुढे काय घडलं? पाहा थरारक घटनेचा CCTV

  कृषी पदवीधारकांच्या माध्यमातून विविध ठिकाणी कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, ग्रामपातळीवरील विस्तार, ग्रामसेवक, कृषी मदतनीस, तज्ज्ञ प्रशिक्षक, कृषी संशोधक, आधुनिक शेतकरी यांना सहाय्य करून देशाच्या कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देणे, कृषी आधारित स्टार्टअप्स सुरु करणे यासारख्या बाबी साध्य करणे यामुळे शक्य होणार आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Agriculture, Nashik, Uddhav thackeray

  पुढील बातम्या