Home /News /agriculture /

Wheat scarcity : 'या' देशात गव्हाची मोठी टंचाई, भारताकडे मागितली मदत, बदल्यात भारताला मुबलक खते देणार

Wheat scarcity : 'या' देशात गव्हाची मोठी टंचाई, भारताकडे मागितली मदत, बदल्यात भारताला मुबलक खते देणार

भारताने गहू निर्यात बंदी करण्याचा (India bans wheat exports) निर्णय घेतला या निर्णयाने देशासह जगभरात याचे पडसाद उमटले.

  नवी दिल्ली, 17 जून : मागच्या काही दिवसांपूर्वी भारताने गहू निर्यात बंदी करण्याचा (India bans wheat exports) निर्णय घेतला या निर्णयाने देशासह जगभरात याचे पडसाद उमटले. दरम्यान रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine war) यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात गव्हाची टंचाई(Wheat scarcity) भासू लागली आहे. युक्रेन पाठोपाठ भारत हा दुसरा गहू निर्यातदार उत्पादक असल्याने भारताकडून गहू निर्यातीची मागणी वाढली आहे. भारताला सध्या खतांची गरज असल्याने भारत आणि इजिप्त यांच्यात करार होण्याची शक्यता आहे. (Agreement between India and Egypt) भारताकडून गहू इजिप्तला निर्यात करायचा आणि इजिप्तने भारताला खतांबरोबर इतर संसाधने देण्याचा करार होण्याची शक्यता आहे.

  इजिप्त भारताकडून पाच लाख टन गहू आयातीचा करार करण्याची शक्यता आहे. त्या बदल्यात भारताला खत आणि इतर उत्पादने देण्याची तयारी इजिप्तने दर्शविली आहे. पुढील हंगामातही गव्हाची टंचाई भासण्याच्या भीतीने इजिप्त सावध झाला आहे. गहू पुरवठ्यातील अनिश्चितता लक्षात घेऊन देशात गव्हाचा पुरेसा साठा असावा, यासाठी इजिप्तची धडपड सुरू आहे.

  हे ही वाचा : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी होणार कृषीमंत्र्यांच्या थेट इशारा

  इजिप्तने यंदा पहिल्यांदाच भारताकडून गहू आयात केला. मागील आठवड्यात सर्व तपासण्या, अटी आणि शर्ती पूर्ण करून 55 हजार टन गहू इजिप्तच्या बाजारात दाखल झाला. भारतीय गव्हाची गुणवत्ता आणि पोषणमूल्य लक्षात घेऊन इजिप्तने आणखी पाच लाख टन आयातीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याबदल्यात इजिप्त भारताला खते आणि इतर उत्पादने देऊ शकेल, असे इजिप्तचे पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय व्यापारमंत्री अली अल-मुसेल्ही यांनी सांगितले.

  तुर्कस्तानने विषाणूचे कारण देत भारतीय गहू नाकारला होता. त्यामुळे गहू निर्यातीवर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त होत होता; मात्र जागतिक पातळीवर गहूटंचाई भासत आहे. अनेक देश गव्हासाठी चाचपणी करत आहेत; मात्र सध्या केवळ भारताकडेच नवीन पीक आहे. भारताने निर्यातबंदी केली असली तरी शासन पातळीवर निर्यात सुरू आहे. केंद्र सरकारने ज्या देशांची अन्नसुरक्षेसाठी गहू पाठवण्याची मागणी मान्य केली आहे, त्यांना निर्यातबंदीतून सूट देण्यात आली आहे.

  हे ही वाचा : काश्मीरी पंडितांबाबतचं 'ते' वक्तव्य साई पल्लवीला भोवलं;अभिनेत्रीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

  आंतरराष्ट्रीय बाजारात दर तेजीत 2021 च्या हंगामात अनेक देशांत गहू उत्पादन कमी झाले. रशिया आणि युक्रेन हे देश गहू निर्यातीत आघाडीचे देश आहेत. त्यांच्यात युद्ध सुरू झाल्यामुळे निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत गव्हाचे दर 40 टक्क्यांनी वाढले. तसेच रशिया, युक्रेनमध्ये यंदा गव्हाची पेरणी घटली आहे. त्यामुळे जागतिक गहूटंचाई केवळ याच वर्षापुरती मर्यादित राहील, असे म्हणता येणार नाही. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अंदाजानुसार 2022 आणि 23 या वर्षांतही धान्य उत्पादन कमी राहील. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाचे दर तेजीत आहेत.

  चार महिने पुरेल एवढाच गहूसाठा

  इस्लामिक विकास बँकेच्या बैठकीदरम्यान इजिप्तचे पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय व्यापारमंत्री अली अल मुसेल्ही यांनी गहू निर्यातीच्या संदर्भात भारतीय राजदूतांसोबत चर्चा केली. भारताकडून विविध टप्प्यांत पाच लाख टन गहू आयातीचे करार करण्यासाठी चर्चा झाल्याचे मुसेल्ही यांनी स्पष्ट केले आहे. इजिप्तमध्ये सध्या चार महिने पुरेल एवढाच गव्हाचा साठा शिल्लक आहे. चालू हंगामातील पीक खरेदी केल्यानंतर 2022 च्या शेवटपर्यंत पुरेल एवढा गहू सरकारकडे असेल. परंतु पुढील हंगामातील अनिश्चितता लक्षात घेऊन इजिप्त भारताकडून गहू खरेदी वाढवण्याच्या विचारात आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Agriculture, Farmer

  पुढील बातम्या