मराठी बातम्या /बातम्या /agriculture /

Pune : पुण्यातील कॉलेजमध्ये क्रांतीकारी प्रयोग, IVF तंत्रज्ञानानं पहिल्यांदाच साहिवाल कालवडीचा जन्म VIDEO

Pune : पुण्यातील कॉलेजमध्ये क्रांतीकारी प्रयोग, IVF तंत्रज्ञानानं पहिल्यांदाच साहिवाल कालवडीचा जन्म VIDEO

देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र कृषी महाविद्यालय पुणे येथे भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी विद्यापीठामध्ये पहिल्यांदाच साहिवाल जातीच्या कालवडीचा जन्म संकरित गायीच्या माध्यमातून झाला आहे.

पुणे, 19 सप्टेंबर : देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र कृषी महाविद्यालय पुणे येथे भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी विद्यापीठामध्ये पहिल्यांदाच साहिवाल जातीच्या कालवडीचा जन्म संकरित गायीच्या माध्यमातून झाला आहे. भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून जन्मलेल्या साहिवाल जातीच्या कालवडीचे वजन 27. 400 किलो इतके आहे. या कालवडीचा पिता बायफ करीम असून वळूमाता लक्ष्मी हिचे दूध 4800 लिटर प्रति वेत इतके आहे. तसेच दाता गाई क्र. एनडीडीबी 160050250262 असून तिचे एकावेतातील दुध उत्पादन 4384  लिटर इतके आहे, अशी माहिती भ्रूण प्रत्यारोपण सह समन्वयक डॉ. प्रमोद साखरे यांनी दिली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाने सन 2020-2024 या कालावधीसाठी मंजूर केला होता. तत्कालीन माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व माजी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या विशेष प्रयत्नातून सदर प्रकल्प साकारला आहे. भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून सुमारे 150 पेक्षा जास्त भ्रूण जन्म होणार आहे. यामध्ये साहिवाल, गीर, राठी, थारपारकर व लाल सिंधी या देशी जातीच्या वासरांचा जन्म होणार आहे. हे तंत्रज्ञान राहुरी सीमेन स्टेशन (एनडीडीबी) यांच्या मार्फत राबविण्यात येत असून उच्च वंशावळीच्या देशी गोवंशाची संख्या वाढवण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे. हेही वाचा : Pune : लम्पी आजाराने घाबरू नका, 'या' पद्धतीने घ्या प्राण्यांची काळजी, पाहा VIDEO भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान म्हणजे काय? उत्कृष्ट अनुवंशिकता असलेल्या दाता गाईपासून कृत्रिमरीत्या स्त्रीबीज मिळवून त्यांचे प्रयोगशाळेत चांगला अनुवंशिकता असलेल्या वळूच्या वीर्यासोबत फलन करणे व तयार झालेल्या फलितांडाची (पोटेन्शियल झायगोट) सात दिवस वाढ करून त्यापासून तयार झालेले भ्रूण हे कमी गुणवत्ता अथवा उत्पादन क्षमता असलेल्या प्राप्तकर्ता गायीमध्ये प्रस्थापित करून त्याची वाढ करणे व त्यापासून उच्च दर्जाचे वासरू मिळवणे. भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान हा आशेचा किरण  देशी गाईंची घटती संख्या पाहता भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान हा आशेचा किरण आहे व या तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांपर्यंत होणे अत्यंत गरजेचे आहे. गावठी अथवा संकरित  गाईंच्या माध्यमातून उच्च वंशावळीच्या देशी गाईंच्या कालवडी तयार करून बदलत्या हवामानामध्ये तग धरणाऱ्या व रोग प्रतिकारक क्षमता जास्त असणाऱ्या देशी गाईंची संख्या वाढवून महाराष्ट्रात दुध उत्पादन वाढीस मदत होणार आहे. आत्तापर्यंत या प्रकल्पांतर्गत गीर व साहिवाल या जातीच्या कालवडी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार झालेल्या आहेत. तसेच पुढील काळात थारपारकर, लाल सिंधी व राठी गाईवरती सुद्धा काम चालू आहे, अशी माहिती भ्रूण प्रत्यारोपण सह समन्वयक डॉ. प्रमोद साखरे यांनी दिली आहे.
First published:

Tags: Agriculture, Farmer, Pune

पुढील बातम्या