जालना, दि. 14 मे : महाराष्ट्रात मागच्या दोन दिवसांपासून असानी चक्रीवादळामुळे (asani cyclone) ढगाळ वातावरण होते. दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेच्या झळा बसू लागल्या होत्या. (heat wave) यातचं जालन्यात पावसाने (jalna rain) हजेरी लावली आहे यामुळे उष्मा घाताने त्रासलेल्या नागरिकांना तुर्तासतरी दिलासा मिळाला आहे. (Maharashtra weather update)जालन्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्याच वादळी -वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने वातावरणात अचानक बदल जाणवत आहे. उन्हाच्या तडाख्याने (heat wave) त्रासलेल्या नागरिकांना पावसाने काही काळासाठी दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आज सकाळपासून जालन्यात तापमानात उष्णता जाणवत होती ढगाळ वातावरण असल्याने दुपारनंतर पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती. परतूर तालुक्यातील काही गावांसह केंधळी, वाटूर, एदलापूर येथे पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हवेत मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे.हे ही वाचा : कळवा पोलीस कळंबोलीच्या दिशेला, नवी मुंबई पोलिसांकडून केतकी चितळेचा ताबा घेणार, घडामोडींना वेगहवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल अवघ्या दोन आठवडे राहिले आहेत. 27 मे दरम्यान दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या उपसागरात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाचा अंदाज जाहीर केला होता. त्याआधीच जालन्यात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.मेच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून अंदमानमध्ये दाखल होतो. दरम्यान यंदा चार दिवस आधीच पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार १३ ते १९ मे दरम्यान म्हणजेच वेळेआधी मान्सून हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर केरळमध्ये २० ते २६ मेपर्यंत पाऊस दाखल होईल तर तळकोकणात २७ मे ते २ जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार हवामानाचा अंदाजशेती, शेती आणि सिंचन, आरोग्य अशा विविध क्षेत्रांसाठी हवामानाचा अंदाज मराठीसह अन्य 24 सोप्या भाषेत सांगणारे अॅप आता लवकरच उपलब्ध होणार आहे. भारतीय हवामान विभाग आणि भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या संयुक्तपणे ही प्रणाली विकसित करण्यात येत असून ती लवकरच शेतकर्यांसाठी उपलब्ध होणार आहे.भारतीय हवामान विभाग (आयएमडी) आणि तंत्रज्ञान संस्थेच्या सहकार्याने ही प्रणाली विकसीत करण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण, शहरी आणि जिल्हा स्तरावरील नागरिकांसाठी हवामानाचे अंदाज सोप्या पद्धतीने समजण्यासाठी या प्रणालींची निर्मिती केली जाणार आहे.
Published by:Sandeep Shirguppe
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.