मुंबई, 05 मे : ऊस हे पीक १८ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीचे आणि दीर्घ मुदतीचे पीक आहे. या पीकाला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज जास्त असल्याने पाणी व्यवस्थापनाचे (water management) योग्य नियोजन करावे लागतं. उसाला लागणार्या पाण्याची गरज प्रामुख्याने जमिनीचा प्रकार, वर्षभरात पडलेला पाऊस (rain), तापमान (temperature), मशागत पद्धती, पाणी वापर कार्यक्षमता या बाबींवर अवलंबून असते. (sugarcane farming)
उसाची वाढ आणि जमिनीतील ओलावा यांचे फार घनिष्ठ संबंध आहेत. उसाची लागवड भारी जमिनीत केल्यास पाण्याचा ताण हे पीक सहन करू शकते. उसाच्या चार महत्त्वाच्या संवेदनशील अवस्था असून प्रामुख्याने उगवणीचा कालावधी, फुटवे फुटण्याची अवस्था, मुख्य वाढीचा काळ आणि ऊस पक्व होण्याचा कालावधी. या अवस्थांमध्ये पाणी नियोजन करणे गरजेचे आहे. फुटवे फुटणे आणि मुख्य वाढीचा काळ मार्च ते मे या प्रदीर्घ उन्हाळयात महिन्यांमध्ये पाण्याचा ताण पडतो. यावेळी त्याची काळजी घेणे महत्वाचे असते.
हे ही वाचा : Gold Price Today: सोन्याच्या दरात आज वाढ, चांदीही महागली; चेक करा नवीन दर
पावसाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा लांब कांडी पडतात म्हणून या महिन्यात उसाच्या मुळाच्या सान्निध्यात पुरेशी ओल ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जमिनीच्या प्रकारानुसार ज्यांच्याकडे पुरेसे पाणी आहे, त्यांनी उन्हाळी हंगामात पाण्याचे नियोजन करावे. संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडला व नंतरच्या अवस्थेत भरपूर पाणी दिले तरी नुकसान भरून येत नसल्याने पाण्याचे योग्य नियोजन महत्वाचं आहे.
ठिबक सिंचन पद्धतीमध्ये उसाची लागवड रुंद सरी पद्धतीने 5 ते 6 फूट आंतरावर करावी. लागवड पद्धतीत बदल करून मर्यादित पाण्यावर उसाचे पीक घेता येईल. पाण्यामध्ये 50 टक्यापर्यंत म्हणजेच हेक्टरी 125 लाख लिटर एवढी पाण्याची बचत होते. रोपांची लागण करताना दोन रोपांत भारी जमिनीत 2 फूट अंतर ठेवावे. पिकाची एकसारखी वाढ होते.
सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील ओलावा धरून ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीतील अंतर्गत तापमान संतुलित राहते. सेंद्रिय खतामुळे जमिनीची जलधारणक्षमता, जडणघडण आणि हवेचे प्रमाण वाढते. त्याच बरोबर सेंद्रिय कर्बाचा पुरवठा सुरळीत होतो. सेंद्रिय पदार्थांमध्ये प्रामुख्याने हिरवळीचे खत, हंगामानुसार हेक्टरी 20 ते 30 टन शेणखत, 5 टन कंपोस्ट खत आणि 5 टन गांडूळ खत यांचा वापर करावा. यामुळे उसाचे पीक पाण्याचा ताण सहन करू शकते.
ज्याठिकाणी पाचटाचा वापर केला नाही त्याठिकाणी पाण्याचा ताण पडल्यानंतर भेगा पडल्याचे आढळून येते. त्यामुळे जमिनीतील ओल बाष्पीभवनाने झपाट्याने कमी होते. जमिनीला भेगा पडू नये म्हणून छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने आंतरमशागतीची (कुळवणी) कामे करावीत. मातीच्या थरामुळे आच्छादन तयार होते, त्यामुळे भेगा पडण्याचे प्रमाण लांबणीवर पडते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sugar facrtory, Sugarcane, Sugarcane farmer, Sugarcane in maharashtra, Sugarcane Production