मुंबई, 7 डिसेंबर : काही महिन्यापूर्वी भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या (farmer) डोळ्यात अश्रू आणणाऱ्या टोमॅटोमुळे (Tomato) आता शहरी भागातील नागरिकांचा खिसा कापला जात आहे. कारण टोमॅटोच्या दरात अचानक वाढ झाली आहे. टोमॅटो स्वयंपाकात नियमित वापरला जाणारा पदार्थ असल्याने महाग असला तरी तो विकत घ्यावाच लागत आहे. आवक घटल्याने टोमॅटोचे दर (Tomato price) अचानक वाढले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात किरकोळ बाजार (Retail Market) टोमॅटोचे दर 50-60 रुपयांवर पोहोचले आहे.
मागील काही दिवसात राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली होती. या अवकाळी पावसामुळे आणि बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. यात टोमॅटोच्या पिकावरही मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे टोमॅटोची आवक मुंबई आणि आजूबाजूच्या परिसराक कमी झाली. आवक घटल्याने टोमॅटोच्या दरात अचानक वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
हिवाळ्यात मेथीच्या पराठ्यांचा नाश्ता सर्वोत्तम, वाचा फायदे
दक्षिण भारतात टोमॅटोचे दर 140 रुपयांवर
दक्षिण भारतातील काही भागांमध्ये टोमॅटोची किंमत 140 रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. मुसळधार पावसामुळे टोमॅटोच्या सुरळीत होत नसल्याने ही वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, टोमॅटोचा भाव सोमवारी उत्तर भारतात 30-83 रुपये प्रति किलो होता, पश्चिम भागात 30-85 रुपये आणि पूर्व भारतात 39-80 रुपये प्रति किलो होता.
रात्रीचं जेवण 'या' वेळी केलं तर होईल वजन कमी, जाणून घ्या वेटलॉसचा फंडा
दक्षिण भारतात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. सोमवारी अंदमान निकोबारच्या मायाबंदरमध्ये 140 रुपये, पोर्ट ब्लेअरमध्ये 127 रुपये होते. तिरुअनंतपुरम, केरळमध्ये 125 रुपये, पलक्कड आणि वायनाड 105 रुपये, त्रिशूर 94, कोझिकोड 91 आणि कोट्टायम 83 रुपये प्रति किलो होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.