मराठी बातम्या /बातम्या /agriculture /

Beed : परतीच्या पावसानंतर नवं संकट, कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत, Video

Beed : परतीच्या पावसानंतर नवं संकट, कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत, Video

X
भाव

भाव नसल्यानं बाजारात कापून येत नसून जिनिंगसुद्धा ओस पडू लागल्याचे चित्र आहे.

भाव नसल्यानं बाजारात कापून येत नसून जिनिंगसुद्धा ओस पडू लागल्याचे चित्र आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

बीड, 08 डिसेंबर : बीडमधील पांढऱ्या सोन्यासाठी शेती सर्व दूर परिचित आहे. यंदा झालेल्या पावसाने कापूस उत्पादकांना जबर तडाखा बसला. कसेबसे सावरून पिकं वाढवली. मात्र, म्हणावा तेवढं उत्पन्न मिळालं नाही. त्यात आला बाजारभाव देखील भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भाव नसल्यानं बाजारात कापून येत नसून जिनिंगसुद्धा ओस पडू लागल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला आहे. भाव वाढेल की नाही, याची चिंता मात्र कायम आहे. 

बीड जिल्ह्यात यावर्षी कापसाच्या पेराचे सर्वसाधारण क्षेत्र 3 लाख 55 हजार 454 हेक्टर इतके आहे. यापैकी 2 लाख 39 हजार 567 इतका कापसाचा पेरा झाला. संपूर्ण जिल्ह्यामध्ये 67% प्रमाणात कापसाची लागवड करण्यात आली आहे. मात्र, यावर्षी शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस घरातच आहे.

जिनिंगमध्ये शुकशुकाट

गेल्यावर्षी कापसाला 11 हजार  रुपये पर्यंत भाव मिळाला होता. यंदाही चांगला भाव मिळेल याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, सध्या कापसाला 8 हजार 500 रुपये पर्यंतच भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आपला कापूस अद्यापही बाजारात विक्रीसाठी आणला नाही. तर दुसरीकडे बाजारपेठ आवक घडल्यानं कापूस जिनिंगमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

10 ऑक्टोबर पासून कापूस खरेदीविक्रीला सुरुवात झाली. सुरुवातीला दहा हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल पर्यंत भाव मिळाला जिनिंग व खाजगी व्यापारी कापूस खरेदी करू लागले. अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापूस विक्रीला काढत स्वतःची आर्थिक गरज भागवली. तर आणखीन भाव वाढतील या आशेने बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस विक्रीलाच काढला नाही.

रब्बी पिकावर बुरशीचा हल्ला, शेतकऱ्यांची चिंता वाढली

परतीच्या पावसाने कापसाचे नुकसान

जिल्ह्यामध्ये यावर्षी परतीच्या पावसाने पिकांना चांगलेच झोडपले. यात पिकांचे मोठे नुकसान झाले होते. ज्या शेतकऱ्यांना चार एकरामध्ये 40 ते 45 क्विंटल दरवर्षी कापूस होत होता. यावर्षी तोच कापूस पंधरा ते वीस क्विंटल पर्यंतच भरला आहे. शिवाय मशागतीचा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. 

अचानक संकट आलं तर काय करणार? NDRF नं प्रात्याक्षिकातून दिला धडा, Video

जिनिंगमध्ये कापसाची आवक कमी

शेतकऱ्यांना कापसाला अधिक भाव मिळत नसल्यामुळे कापसाच्या जिनिंग मध्ये कापसाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. गेल्या वर्षी 1000 पेक्षा अधिक क्विंटल कापसाची आवक दररोज व्हायची. सध्या दररोज 100 क्विंटल देखील कापसाची आवक होत नसल्याचे जिनिंग व्यावसायिक सांगतात.

First published:

Tags: Beed, Local18