Home /News /agriculture /

onion rate : कांद्याचे उत्पादन सोडा बियाणांचा खर्चही निघेना, आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत 50 पैसे किलो कांद्याला भाव

onion rate : कांद्याचे उत्पादन सोडा बियाणांचा खर्चही निघेना, आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत 50 पैसे किलो कांद्याला भाव

आशिया खंडातील कांद्याची मोठी बाजारपेठ समजली जाते या बाजारपेठेत 50 पैसे किलो दराने एका शेतकऱ्याचा कांदा विक्री (50 paise onion rate) झाला आहे.

  नाशिक, 20 मे : देशात सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन (onion rate) हे महाराष्ट्रात घेतले जाते. देशासह परदेशातही राज्यातील कांदा निर्यात (onion export) होत असतो. दरम्यान उन्हाळी कांद्याने (Summer onion) शेतकऱ्यांला चांगला भाव येण्याची आशा होती परंतु कांदा अगदी कवडीमोल भावात विकला जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातीलच नाहीतर गुजरातमध्येही कांदा उत्पादक (Onion growers in Gujarat) शेतकऱ्यांची अवस्था हीच आहे. दरम्यान आज आशिया खंडातील कांद्याची मोठी बाजारपेठ समजली जाते या बाजारपेठेत 50 पैसे किलो दराने एका शेतकऱ्याचा कांदा विक्री (50 paise onion rate) झाला आहे. यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघाला नसल्याने निराशा पदरी पडली आहे.

  यावर्षी उन्हाळी कांद्याच्या उत्पादनात चांगली वाढ झाली आहे. याचा फायदा व्यापारी आणि अडत्यांनी घेतला आहे. मागणी नसल्याने दरात मोठी घसरण होत आहे. दरम्यान चांगल्या गुलयी कांद्याचे सौदे होत आहेत परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रतिचा कांदा शेतकरी जागेवर सोडून जात आहेत. यामुळे वाहतूकीचा खर्चही कांदा उत्पादक शेतकऱ्याला निघत नसल्याचे दिसून येत आहे. मागच्या चार दिवसांपुर्वी एका शेतकऱ्यांने ४०० किलो कांदा फुकट वाटला होता.

  हे ही वाचा : minister dada bhuse : मान्सून लवकर येणार पण पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, कृषिमंत्र्यांनी केलं Alert

  येवला तालुक्यातील देशमाने यांनी गोलटी कांद्या लावला होता हा कांदा मोठा असल्याने चांगला भाव येईल अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु विक्रीसाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणल्यावर 51 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाल्याने देशमाने यांना मोठा धक्का बसला.

  महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक रुपये किलो दराने माल विकावा लागत आहे, तर गुजरातचीही अवस्था वाईट आहे. अनेक भाजी मार्केटमध्ये कांद्याचे भाव अत्यंत कमी दरात जात आहेत. शेतकऱ्यांना 2 ते 4 रुपये किलो प्रमाणे कांदा विकावा लागत आहे परंतु अडते आणि व्यापारी किलोमागे 40 कांद्याला भाव घेत आहेत.

  हे ही वाचा : Alphonso export : कोकणच्या हापूसने अमेरिकेला लावलं वेड; पुण्यातून थेट White House मध्ये आंबा जाणार

  गुजरात हे देशातील चौथ्या क्रमांकाचे कांदा उत्पादक राज्य आहे. गुजरातमध्ये देशातील 8.21 टक्के कांद्याचे उत्पादन होते. बाजारभावावरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली आहे. आज महाराष्ट्र आणि गुजरातमधील शेतकऱ्यांना सरासरी एक ते चार रुपये किलो दराने कांदा विकावा लागत आहे. दरम्यान नॅशनल हॉर्टिकल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशनने 2014 मध्येच दिलेल्या अहवालानुसार कांदा उत्पादनासाठी प्रति किलोला 7 रुपये खर्च येतो.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Farmer, कांदा, कांदा आणि बटाट्, कांदा उत्पादक शेतकरी, शेतकरी

  पुढील बातम्या