Home /News /agriculture /

onion price : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक संकटात, शेतकऱ्यांनी थेट शेतातील कांद्यावर फिरवला नांगर

onion price : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक संकटात, शेतकऱ्यांनी थेट शेतातील कांद्यावर फिरवला नांगर

महाराष्ट्रात कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी (Onion grower farmers) अडचणीत सापडला आहे. दोन महिन्यांपूर्वी जो कांदा ३५ रुपये किलोने विकला जात होता, तो आज 50 पैसे आणि 1 रुपये किलोने विकला जात आहे.

  जळगाव, 22 मे : महाराष्ट्रात कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी (Onion grower farmers) अडचणीत सापडला आहे. दोन महिन्यांपूर्वी जो कांदा ३५ रुपये किलोने विकला जात होता, तो आज 50 पैसे आणि 1 रुपये किलोने विकला जात आहे. एवढ्या कमी दरात कांदा (onion price) विकण्यापेक्षा फुकटात वाटप केलेला बरा असे म्हणत काही शेतकऱ्यांनी कांदा फुकट वाटला. दरम्यान काही शेतकऱ्यांनी कांदा न काढताच आपल्याच रानात नांगरट फिरवत मुजवून टाकला आहे. खर्च दुप्पट आणि उत्पादन शून्य झाल्याची शेतकऱ्यांनी व्यथा मांडली आहे. जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon district) बहुतांश शेतकऱ्यांची ही परिस्थिती झाली आहे.

  शेतमालाची बाजारपेठेत वाहतूक करण्यासाठी जेवढा खर्च केला जात आहे. तेवढा भावही मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जळगाव जिल्ह्यातील विष्णू इंगळे यांनी आपल्या 4 एकर जमिनीत कांद्याची लागवड केली होती. कांद्याला चांगला भाव मिळेल, अशी आशा त्यांना होती. सध्या एक रुपये किलो दराने कांदा विकला जात आहे. हे पाहून त्यांनी शेतात ट्रॅक्टर फिरवत चार एकरात कांद्याबरोबर असलेले मोहरी पीक ही नष्ट केले.

  हे ही वाचा : sugarcane farmer : शेतकरी चिंतेत! राज्यात अद्यापही 17.5 लाख ऊस शिल्लक, अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर

  यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्याच्या रामदास गरुड या शेतकऱ्यानेही कांद्याच्या घसरलेल्या भावामुळे नाराज होऊन 2 एकर शेतातील कांद्याचे पीक काढून टाकले होते. तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीची सोय नाही, ते कांदा विकण्याऐवजी फेकून देण्याचा पर्याय निवडत आहेत.

  पीक काढणी, वाहतूक, नांगरट यावर मोठ्या प्रमाणात खर्च येत असल्याचे शेतकरी विष्णू इंगळे यांनी सांगितले. कांद्याला कमी दर मिळाल्याने त्यावर ट्रॅक्टर फिरवने मला चांगले वाटले आणि खरीप हंगामातील दुसरे पीक घेण्यासाठी शेत तयार केल्याचे ते म्हणाले. 4 एकरात कांद्याची लागवड करण्यासाठी सुमारे 2 लाखांहून अधिक खर्च आल्याचे ते म्हणाले.

  गुजरातमध्येही हीच परिस्थिती

  गुजरात हे देशातील चौथ्या क्रमांकाचे कांदा उत्पादक राज्य आहे. गुजरातमध्ये देशातील 8.21 टक्के कांद्याचे उत्पादन होते. बाजारभावावरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली आहे. आज महाराष्ट्र आणि गुजरातमधील शेतकऱ्यांना सरासरी एक ते चार रुपये किलो दराने कांदा विकावा लागत आहे. दरम्यान नॅशनल हॉर्टिकल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशनने 2014 मध्येच दिलेल्या अहवालानुसार कांदा उत्पादनासाठी प्रति किलोला 7 रुपये खर्च येतो.

  हे ही वाचा : weather update : मुंबईकरांना मान्सूनपूर्व पावसाचा दिलासा, तर 'या' तारखेला मुसळधार पावसाचा IMD चा इशारा

  गुजरातमधील कांद्याचे बाजारभाव राजकोटच्या गोंडल मार्केटपेक्षा कांद्याचा किमान भाव 155 रुपये प्रति क्विंटल होता. सरासरी किंमत 455 तर कमाल 930 रुपये होती. राजकोटच्या जेतपूर मार्केटमध्ये, किमान भाव 100 कमाल 555 आणि सरासरी भाव फक्त 230 रुपये प्रति क्विंटल होता.

  भावनगरच्या महुवा मार्केटला शेतकऱ्यांना किमान 150 रुपये, कमाल 1015 रुपये आणि सरासरी 585 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मेहसाणा मार्केटला कांद्याला किमान 150 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. कमाल 1100 आणि सरासरी 900 रुपये दरात कांदा विकला गेला. जुनागड बाजार पेठेत कांद्याचा किमान भाव 160 रुपये प्रति क्विंटल होता. तर जास्तीत जास्त 430 दर मिळाला, सरासरी भाव 295 रुपये प्रतिक्विंटल होता.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Farmer, Farmer protest

  पुढील बातम्या