Home /News /agriculture /

Onion Rate : राज्यातील राहाता बाजार समितीत कांद्याचे 'वांदे' मिटले, दरात झाली एवढी वाढ

Onion Rate : राज्यातील राहाता बाजार समितीत कांद्याचे 'वांदे' मिटले, दरात झाली एवढी वाढ

लासलगावच्या बाजारसमितीमध्ये कांद्याला दर कमी मिळत असला तरी नगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत (nagar district rahata market committe) कांद्याला दर मिळत आहे

  नगर, 05 जून : सध्या महाराष्ट्रात कांद्याच्या दराची (onion rate) देश पातळीवर चर्चा आहे. अनेक बाजार समित्यामंध्ये कांद्याला किमान ५० पैशांवरून १ रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे. याबाबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात रोष आहे. यासाठी पुणतांबे येथे शेतकऱ्यांनी आंदोलनही केले होते. (maharashtra onion grower farmerदरम्यान लासलगावच्या बाजारसमितीमध्ये कांद्याला दर कमी मिळत असला तरी नगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत (nagar district rahata market committe) शुक्रवारी कांद्याला प्रति क्विंटल 17,00 रुपयांचा दर मिळाला.

  शुक्रवारी 16,116 कांदा गोण्यांची आवक झाली. कांदा नं 1 ला 1200 ते 1700 शे रुपये, 2 नंबरला 750 ते 1150, गोल्टी कांदा 800 ते 1000 रुपये, कांदा नं. 3 ला 300 ते 700 रुपये तर जोड कांद्याला 100 ते 300 रुपयांचा भाव मिळाला. यामुळे तुर्तास का असेना राज्यातील कांदा उत्पादकाला किमाना 10 रुपयाच्यावर दर मिळण्यासा सुरू झाले आहे.

  हे ही वाचा : वाचाळगिरी भोवली, अखेर भाजपने केले नुपुर शर्मांना निलंबित

  डाळिंबाच्या 709 क्रेटसची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 111 ते 140 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 76 ते 110 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 36 ते 75 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 4 ला 10 ते 35 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला कमीत कमी 6001 रुपये, जास्तीत जास्त 6350 रुपये तर सरासरी 6300 रुपये इतका भाव प्रतिक्विंटलला मिळाला.

  गव्हाला सरासरी 2184 रुपये. मकाला सरासरी 2207 रुपये भाव मिळाला हरभरा कमीत कमी 3700 रुपये जास्तीत जास्त 4005 रुपये, तर सरासरी 3900 रुपये भाव मिळाला. ज्वारीला कमीत कमी 1481 रुपये, जास्तीत जास्त 1641 रुपये, सरासरी 1561 रुपये बाजरीला कमीत कमी 2061 रुपये, जास्तीत जास्त 2182 रुपये सरासरी 2125 रुपये, असा भाव मिळाला असल्याची माहिती सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

  हे ही वाचा : Fruit Crop Insurance Scheme : फळपीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या तारखा ठरल्या

  महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक ते दोन रुपये किलो दराने माल विकावा लागत आहे, तर गुजरातचीही अवस्था वाईट आहे. येथील अनेक भाजी मार्केटमध्ये कांद्याचे भाव अत्यंत कमी दरात जात आहेत. शेतकऱ्यांना 2 ते 4 रुपये किलो प्रमाणे कांदा विकावा लागत आहे परंतु अडते आणि व्यापारी किलोमागे 40 कांद्याला भाव घेत आहेत.

  गुजरात हे देशातील चौथ्या क्रमांकाचे कांदा उत्पादक राज्य आहे. गुजरातमध्ये देशातील 8.21 टक्के कांद्याचे उत्पादन होते. बाजारभावावरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली आहे. आज महाराष्ट्र आणि गुजरातमधील शेतकऱ्यांना सरासरी एक ते चार रुपये किलो दराने कांदा विकावा लागत आहे. दरम्यान नॅशनल हॉर्टिकल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशनने 2014 मध्येच दिलेल्या अहवालानुसार कांदा उत्पादनासाठी प्रति किलोला 7 रुपये खर्च येतो.

  गुजरातमधील कांद्याचे बाजारभाव राजकोटच्या गोंडल मार्केटपेक्षा कांद्याचा किमान भाव 155 रुपये प्रति क्विंटल होता. सरासरी किंमत 455 तर कमाल 930 रुपये होती. राजकोटच्या जेतपूर मार्केटमध्ये, किमान भाव 100 कमाल 555 आणि सरासरी भाव फक्त 230 रुपये प्रति क्विंटल होता.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Ahmednagar, Ahmednagar News, Farmer, Onion

  पुढील बातम्या