Home /News /agriculture /

Nanded agriculture department : नांदेड कृषी विभागाची मोठी कारवाई, हजारो किलो बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर छापा

Nanded agriculture department : नांदेड कृषी विभागाची मोठी कारवाई, हजारो किलो बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर छापा

राज्यात बोगस बियाणांची (bogus seeds) विक्री होऊ नये म्हणून कृषी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. याद्वारे विविध जिल्ह्यात कारवाई होत आहे. (agriculture department)

  नांदेड, 28 मे : मागच्या वर्षी मान्सूननंतर (monsoon) येणाऱ्या खरीप हंगामात (kharif sowing) राज्यात जवळजवळ 143 लाख हेक्टरच्या पुढे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. (farmer) दरम्यान मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पेरण्या जादा होण्याची शक्यता शासनाने माहिती दिली आहे. 146ते 147 लाख हेक्टरच्या आसपास पेरणी होणार असल्याने राज्य कृषी विभागाकडून आतापासूनच खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान राज्यात बोगस बियाणांची (bogus seeds) विक्री होऊ नये म्हणून कृषी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. याद्वारे आज नांदेडमध्ये मोठी कारवाई करण्यात आली. (Nanded agriculture department)

  नांदेड कृषी विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. नांदेड शहरातील अर्धापूर रोडला एक कंपनी बोगस बियाणे तयार करत असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाला मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीवर छापा टाकला. यावेळी  कंपनीत सोयाबीन, उडीद, मूग, हरभऱ्याच्या बोगस बियाणांची पॅकिंग करण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे गोदामातील सर्व बियाणे जप्त करण्यात आले.

  हे ही वाचा : ...तर थोबाडीत मारल्याशिवाय राहणार नाही, बच्चू कडूंनी महावितरणच्या अधिकाऱ्याला झापले, VIDEO

  नांदेड शहरातील अर्धापूर रोडवरील एका गोदामात मयुरी सिड्स आणि बुलेट ऍग्री प्रॉडक्ट्स ही कंपनी बोगस बियाणांचे उत्पादन करत होती.  या बोगस विक्री करणाऱ्या कंपनीवर कृषी विभागाने छापा टाकला आहे. या छाप्यात कृषी विभागाने शेकडो क्विंटल बोगस बियाणे जप्त केले आहे. कृषी विभागाने छापा टाकून या कंपनीचा भंडाफोड केलाय. या कंपनीत सोयाबीन, उडीद, हरभरा हा बियाणे तयार केली जात होती.

  यावेळी कंपनीत 20 कामगार काम करत होते. या कामगारांचीही चौकशी होणार आहे. छापा टाकल्यानंतर गोदामात 100 क्विंटल सोयाबीन, 20 क्विंटल हरभरा , 100 क्विंटल उडीद, पॅकिंग मशीन, ग्राइंडर मशीन जप्त केले आहे.  कृषी विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून संबंधित कंपनी सील करण्यात आली आहे.

  हे ही वाचा : मनसेचा पार पडला मेळावा, राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले नवे आदेश

  कृषी अधिकारी अनिल शिरपुरे आणि नांदेड पोलिसांच्या संयुक्त पथकाने हा बोगस बियाणे साठा उघडकीस आणलाय. या कंपनीत प्रथम दर्शनी सोयाबीन, उडीद, हरभरा इत्यादी बियाणे तयार केली जात होती. या कंपने या पूर्वी अशा किती बियाणांची विक्री केली आहे?  आणि अजून कोणत्या प्रकारचे बियाणे तयार केले जात आहे का? याची कसून चौकशी केली जात आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल आगालावे यांनी दिलीय. 

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Agriculture, Monsoon, Nanded

  पुढील बातम्या