Home /News /agriculture /

‘या’ जिल्ह्याचा नादच खुळा एक गाव एक वाण उपक्रमातून 5 हजार 665 हेक्टर क्षेत्रावर करणार लागवड

‘या’ जिल्ह्याचा नादच खुळा एक गाव एक वाण उपक्रमातून 5 हजार 665 हेक्टर क्षेत्रावर करणार लागवड

शेतकऱ्यांचे पीक निघावे, यासह अन्य फायद्यासाठी नगर जिल्ह्यात (nagar district) कृषी विभागाने (agriculture department) ६१ गावांत 'एक गाव एक वाण' उपक्रम राबवला आहे.

  नगर, 18 जून : कापसाच्या पिकांचे (cotton seeds) उत्पादन ते विक्री करेपर्यंत सोपे जावे. एकाचवेळी सर्व शेतकऱ्यांचे पीक निघावे, यासह अन्य फायद्यासाठी नगर जिल्ह्यात (nagar district) कृषी विभागाने (agriculture department) ६१ गावांत 'एक गाव एक वाण' उपक्रमातून ५ हजार 665 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचे नियोजन केले आहे. लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

  नगर जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, नेवासा तालुक्यांत कापसाचे क्षेत्र अधिक आहे. अलीकडच्या काळात जामखेड, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, कोपरगाव तालुक्यांतही कापसाचे क्षेत्र वाढत आहे. वेगवेगळ्या वाणांची लागवड करताना पीक हाती येण्याचाही कालावधी कमी-जास्त असतो. त्यामुळे दरवर्षी कृषी विभागाकडून 'एक गाव एक वाण' उपक्रमातून कापसाची लागवड केली जाते.

  हे ही वाचा : vidhan parishad election : भाजपच्या रणनीतीविरोधात राष्ट्रवादी वापरणार 'खडसे कार्ड', संध्याकाळी महत्त्वाची बैठक

  यंदा या उपक्रमातून नगर तालुक्यात नऊ गावांत 774 हेक्टर, पाथर्डी तालुक्यात 13 गावांत 1460 हेक्टर, कर्जतमध्ये 3 गावांत 82 हेक्टर, श्रीगोंद्यात 7 गावांत 190 हेक्टरवर, श्रीरामपूरला 2 गावांत 130 हेक्टर, राहुरीला 4 गावांत 197 हेक्टर, नेवाशाला 4 गावांत 480 हेक्टर, शेवगावला 8 गावांत 1200 हेक्टर, संगमनेरला 1 गावांत 65, कोपरगावला 6 गावांत 624 हेक्टर, राहाता तालुक्यात 5 गावांत 490 हेक्टर, अशी 61 गावांत 5 हजार 665 हेक्टरवर लागवड करण्याचे नियोजन केले आहे.

  सोयाबीन पिकासाठी एकूण 34.5 लाख क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. सध्या सोयाबीनचे 48.82 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. म्हणजे चालू वर्षी कापूस, सोयाबीन बियाण्याचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा भासणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी चुकीची माहिती अथवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कृषी विभागाने शेतकरी बांधवांना केले आहे.

  हे ही वाचा : vidhan parishad : 'आमदारांना केंद्रीय तपास यंत्रणेकडून फोन', नाना पटोलेंचा गंभीर आरोप

  सोयाबीन पिकाखालील नियोजित क्षेत्र 46.00 लाख हेक्टर असून त्यासाठी एकूण 34.5 लाख क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातून 14.65 लाख क्विंटल एवढे बियाणे उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. या व्यतिरिक्त खरीप 2020 पासून घरचे बियाणे राखून ठेवायची मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत खरीप 2021 हंगामात 44.46 लाख क्विंटल बियाणे उत्पादित झाले आहे.

  कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडून ही सूचना

  राज्यातील शेतकरी बांधवांना खरीप हंगाम-2022 मध्ये दर्जेदार, प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करावा, बियाण्यांची उपलब्धता, पुरवठा सुरळीत व्हावा, सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता गृहीत धरून सोयाबीनच्या बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत नियोजन करावे, तेलबियांच्या बियाणांची उपलब्धता वाढवावी, योजनांच्या माध्यमातून उभ्या केलेल्या बीज प्रकल्पांना गती द्यावी, कोणत्याही शेतकरी बांधवांची तक्रार येऊ नये यासाठी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिले.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Agriculture, Ahmednagar, Ahmednagar News, Farmer

  पुढील बातम्या