Home /News /agriculture /

Nafed Stop Buying Chana : नांदेडमध्ये हरभरा खरेदी बंद केल्याने शेतकरी आक्रमक, कित्येक टन हरभराभरून ट्रक उभे

Nafed Stop Buying Chana : नांदेडमध्ये हरभरा खरेदी बंद केल्याने शेतकरी आक्रमक, कित्येक टन हरभराभरून ट्रक उभे

हरभरा खरेदी बंद (nafed Stop buying chana) केल्याने राज्यातील हरभरा उत्पादक शेतकरी (chana production farmer) चिंतेत आहे.

  नांदेड, 05 जून : केंद्राने अचानक किमान आधारभूत दराने हरभरा खरेदी बंद (nafed Stop buying chana) केल्याने राज्यातील हरभरा उत्पादक शेतकरी (chana production farmer) चिंतेत आहे. हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने अचानक केंद्राकडून हरभरा खरेदी करण्याचे थांबवण्यात आले आहे. यामुळे चांगल्या प्रतीचा हरभरा बाजारात विकण्यासाठी गेल्यास हमीभावापेक्षा कमी (msp rate) दरात विक्री होत असल्याने शेतकऱ्यांची द्विदा अवस्था झाली आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यात नाफेडकडून (nanaded chana) सुरु असलेल्या हरभरा खरेदी पोर्टल बंद केल्याने शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

  नाफेडकडून नांदेड जिल्ह्यात 53 ठिकाणी हरभरा खरेदी पोर्टल सुरु होते. ते बंद झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. दरम्यान हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करून शेतकरी खरेदी केंद्रांवर हरभऱ्याच्या गाड्या घेऊन आले पंरतु हरभरा घेत नसल्याचे समजताच शेतकरी आक्रमक झाले आहेत. शासनाने उर्वरित शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करावा, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

  हे ही वाचा : अपक्ष महाविकास आघाडीसोबतच? सतेज पाटलांचा दावा, मुंबईत सर्व आमदारांची मॅरेथॉन बैठक आयोजित

  जिल्ह्यात नाफेड व 'एफसीआय'कडून हमीदराने 53 ठिकाणी हरभरा खरेदी सुरू आहे. यात महाएफपीसी, पणन महासंघ व 'विदर्भ को आपरेटिव्ह' कडून गावस्तरावर हरभरा खरेदी करण्यात येत आहे. प्रारंभी 29 मेपर्यंत खरेदीची मुदतहोती. परंतु 'नाफेड'ने खरेदीचे उद्दिष्ट संपल्याचे सांगून 23 मे रोजी पोर्टल बंद केले. 

  यानंतर लाखो क्विंटल हरभरा खरेदी शिल्लक राहिली. त्यामुळे केंद्र शासनाने हरभरा खरेदीस 18 जूनपर्यंत मुदतवाढ दिली. यानंतर सोमवारी 30 मे रोजी पोर्टल काही तासांसाठी सुरू करून बंद केले. यानंतर खरेदीची प्रक्रिया शिल्लक राहिल्याने पोर्टल गुरुवारी (ता. 3) पुन्हा बंद केले. यामुळे हरभरा विक्रीसाठी खरेदी केंद्रांवर गाड्या घेऊन आलेले शेतकरी विक्रीअभावी अडकून पडले आहेत. शासनाने उर्वरित शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा 'स्वाभिमानी'चे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे यांनी दिला.

  हे ही वाचा : भारतात पुन्हा वाढला Corona चा आलेख; गेल्या 10 दिवसांत अशी वाढली संख्या, 'या' 5 राज्यांना सर्वाधिक धोका

  केंद्र सरकारने हरभरा खरेदीचे वाढीव टार्गेट दिले होते, ते संपल्यामुळे खरेदी झाली आहे. त्यामुळे जिल्हात २० टक्के शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करणे बाकी आहे. अनेक खरेदी केंद्राचा माल लॉटइंट्रीपेक्षा जास्त शासनाच्या गोडाउनला जमा झाला आहे. आता पर्याय म्हणून राज्य सरकारने शिल्लक हरभरा खरेदी करावा असे गणेश बिरू, जिल्हा समन्वयक, महाएफपीसी, पुणे यांनी अॅग्रोवनशी बोलताना माहिती दिली.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Farmer, Farmer protest, Swabhimani Shetkari Sanghatana

  पुढील बातम्या