Home /News /agriculture /

Monsoon Update : कुठे पाऊस तर कुठे कोरडे, कोकणात विजांसह पावसाचा orange alert

Monsoon Update : कुठे पाऊस तर कुठे कोरडे, कोकणात विजांसह पावसाचा orange alert

राज्यात मान्सूनला जोरदार (Monsoon Update) सुरुवात झाल आहे. कोकण किनारपट्टीवर (Konkan monsoon update)) मान्सूनचा जोर वाढण्यास पोषक वातावरण आहे.

  मुंबई, 25 जून : राज्यात मान्सूनला जोरदार (Monsoon Updateसुरुवात झाल आहे. कोकण किनारपट्टीवर (Konkan monsoon update)) मान्सूनचा जोर वाढण्यास पोषक वातावरण आहे. दरम्यान पुढचे काही दिवस दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' (orange alert in Konkan) देण्यात आला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच पुणे, कोकण, कोल्हापूरातील काही तालुके, तसेच विदर्भ आणि मराठवाडा येथे पावसाने हजेरी लावली.

  राज्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते जोरदार सरी पडत आहेत. दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. मुंबईसह, उर्वरित कोकण, दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, विदर्भातील चंद्रपूर येथे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.

  हे ही वाचा : 'XXला पाय लावून का पळाला, आता बकरी सारखे बेबे करू नका', संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना सुनावलं

  दक्षिण गुजरातपासून कर्नाटकपर्यंत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. अरबी समुद्रातून मान्सूनचे प्रवाह तीव्र असल्याने किनारपट्टीलगत ढगांची दाटी कायम आहे. उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ ते ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही स्थिती पोषक ठरल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान आहे. 

  बुलडाणा जिल्ह्यात दोघांचा वीज पडून मृत्यू

  बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथे वीज पडून दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पळशी झाशी गावालगत असलेल्या शेतात गुरुवारी (दि. 23) विहीर खोदकाम सुरू होते. या ठिकाणी काम करण्यासाठी असलेले संजय उत्तमराव मारोडे (वय 50), रवी भालतडक (वय 35) व त्यांचे अन्य सहकारी काम करीत होते. दुपारी अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला आणि पाऊसही सुरू झाला.

  हे ही वाचा : मुंबई हायअलर्टवर, राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नवे आदेश जारी

  याच दरम्यान घटनास्थळी आभाळात मोठ्याने विजेचा आवाज होऊन पळशीच्या शेतात विहिरीवर सदर वीज पडली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती तातडीने संग्रामपूर तहसीलदारांना देण्यात आली.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Monsoon, Weather forecast, Weather update, Weather warnings

  पुढील बातम्या