Home /News /agriculture /

Monsoon Update : मान्सूनचे 'या' 11 राज्यात जोरदार आगमन, मुंबईसाठी पावसाची महत्वाची अपडेट

Monsoon Update : मान्सूनचे 'या' 11 राज्यात जोरदार आगमन, मुंबईसाठी पावसाची महत्वाची अपडेट

आसाम, पश्चिम बंगाल, ओडिसा (assam, west bengal, odisha heavy rainfall monsoon) या राज्यात मागच्या कित्येक दिवसांपासून मान्सूनचा पाऊस (monsoon update) सुरू आहे.

  नवी दिल्ली, 2 जुलै : बंगालच्या उपसागरातून (Bay of Bengal) सक्रीय होत कोकण किनारपट्टीवरून (Konkan rainfall) आसाम, पश्चिम बंगाल, ओडिसा (Assam, west Bengal, Odisha heavy rainfall monsoon) या राज्यात मागच्या कित्येक दिवसांपासून मान्सूनचा पाऊस (monsoon update) सुरू आहे. दरम्यान काही राज्यात अद्यापही मान्सूनची प्रतिक्षा लागली आहे. तर देशातील अनेक राज्यात मान्सूनची वाटचाल जोरदार सुरू झाली आहे. उत्तरेतील काही राज्यात मान्सून अद्यापही सक्रीय नव्हता परंतु मागच्या दोन दिवसांपासून मान्सून (weather update) पावसाला सुरूवात झाली आहे.

  देशातील कित्येक राज्यात मान्सून (monsoon update) सक्रिय (Heavy Rainfall) झाला आहे. ज्या पावसाने हजेरील लावलेली नाही त्या भागात पुढच्या दोन दिवसांत पावसाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. मुंबई, राजस्थानात सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्येही अडीच तासांत धुवाधार पावसाने झोडपले झाला. 

  हे ही वाचा : 'नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार', देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

  हवामान विभागाच्या माहितीनुसार मध्यप्रदेश, राजस्थानसह 11 जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, महाराष्ट्र, गोवा उत्तर कर्नाटक, उत्तर केरळ येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दिल्ली, पंजाब-हरियाणा येथे मध्यम आणि हलक्या पावसाचा अंदाज आहे. उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये जोरदार पाऊस होईल.

  देशात यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा 8 टक्के कमी पाऊस (Heavy Rainfall) झाला आहे. आकडेवारीनुसार मध्य भारतात सरासरीपेक्षा 30 टक्के कमी तर दक्षिण भारतात सरासरीपेक्षा 14 टक्के कमी पाऊस झाला आहे. बिहारमध्ये सरासरीपेक्षा 6 टक्के अधिक पाऊस झाला आहे. गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सर्व कोटा पूर्ण केला आहे.

  हे ही वाचा : शिंदे गटाला लागली लॉटरी, केंद्रातून मिळणार मंत्रिपद, मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला संधी?

  पंजाबमध्ये 6 जुलैपर्यंत मुसळधार पावासाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर उत्तर प्रदेशातील 23 जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

  मुंबईत पावसाचा जोर ओसरला

  मुंबई शहर व उपनगरात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. अधून मधून पडलेल्या पावसाच्या जोरदार सरीमुळे शहर विभागातील हिंदमाता व सायन गांधी मार्केटसह सुमारे 15 ते 20 ठिकाणी सकल भागात पाणी तुंबले. पश्चिम व पूर्व उपनगरातही मिलन, अंधेरी सबवे, बांद्रा पवई, सक्कर पंचायत वडाळा, एसआयईएस कॉलेज वडाळा, किंग्ज सर्कल, सायन आदी सखल भागात काही प्रमाणात पाणी तुंबले. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला. मात्र पालिकेने सखल भागातील साचलेल्या पावसाच्या पाण्याचा पंपाद्वारे निचरा करण्यात आला.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Monsoon, Rain fall, Weather forecast, Weather update, Weather warnings

  पुढील बातम्या