Home /News /agriculture /

Monsoon Update : मान्सून महाराष्ट्रात सर्वदूर, शेतकरी सुखावला पेरणीच्या कामांना वेग, 'या' जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा

Monsoon Update : मान्सून महाराष्ट्रात सर्वदूर, शेतकरी सुखावला पेरणीच्या कामांना वेग, 'या' जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा

मान्सून महाराष्ट्रात (Monsoon Update IN Maharashtra) पोहोचण्यासाठी उशिर झाला असला तरी राज्यात बऱ्यापैकी मान्सूनचा पाऊस (monsoon rain) जोरदार पडत आहे.

  मुंबई, 26 जून : मान्सून महाराष्ट्रात (Monsoon Update IN Maharashtra) पोहोचण्यासाठी उशिर झाला असला तरी राज्यात बऱ्यापैकी मान्सूनचा पाऊस (monsoon rain) जोरदार पडत आहे. मान्सून पाऊस राज्याच्या विविध भागांत सुरू झाल्याने शेतकऱ्यांकडून (monsoon rain farmer happy) समाधान व्यक्त होत आहे. राज्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने खरिपाच्या (kharif sowing in rain) पेरण्यांना वेग येणार आहे. पेरणी झालेल्या पिकांनाही पावसामुळे दिलासा मिळाला आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात (dam water level hike) वाढ होण्यासाठी पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची आवश्यकता आहे. तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली.

  मागच्या 24 तासांत कोकणात पावसाची संततधार कायम आहे. पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे जिल्ह्यांत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. सिंधुदुर्गातील मालवण येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातही चांगल्या पावसाने हजेरी लावली. कळवण येथे 70 मिलिमीटर पेक्षाही जास्त पाऊस पडला. या शिवाय नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यांतही तुरळक पावसाने हजेरी लावली.

  हे ही वाचा : गुवाहाटीमध्येही 'रात्रीस खेळ चाले', शिंदेंच्या भेटीला आसामचे मंत्री हॉटेलवर प्रकटले!

  मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद, परभणी, बीड, जालना जिल्ह्यांत काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. मराठवाड्यासह विदर्भातही हलक्या पावसाच्या सरी पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. या पावसाने पेरण्यांना वेग येणार असला तरी जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास राज्याच्या घाटमाथ्यावर धरणांच्या पाणलोटांमध्ये जोरदार पावसाची आवश्यकता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

  दरम्यान जोरदार पावसाचा इशारा असल्याने कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसचे कोकणातील ठाणे, पालघर, मुंबई, रायगड या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, आणि सागंली जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यातील चंद्रपूरमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

  हे ही वाचा : राजकीय तणावपूर्ण वातावरणात जालन्यात पोलिसांची कारवाई, तलवारींचा मोठा साठा जप्त

  विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

  मध्य महाराष्ट्र: नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे.

  मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली.

  विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, : अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Monsoon, Weather forecast, Weather update, Weather warnings

  पुढील बातम्या