पावसाने जोर धरल्याने मुंबईसह कोकणात दमदार सरी कोसळत आहेत. दक्षिण कोकणात नद्यामध्ये पाणी पातली वाढली आहे. घाटमाथ्यावरील धारावी येथे सर्वाधिक 280 मिलिमीटर, तर मुंबईतील कुलाबा येथे 230 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. राज्यात कोकण आणि परिसरात पाऊस होत आहे परंतु राज्यातील अनेक भागात पावसाची उघडीप असून, तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.
हे ही वाचा : 'काळाने फडणवीसांवर घेतलेला हा सूड', संजय राऊतांची जळजळीत टीका
अरबी समुद्रात समांतर हवेच्या कमी दाबाचा निर्माण झाल्याने कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांत अनेक ठिकाणी 100 मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद होऊन अतिवृष्टी झाली. तर मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, तर कोकण आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे.
गगनबावडा, महाबळेश्वर, लोणावळा, इगतपुरी भागांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. विदर्भातही चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गडचिरोली अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. तर उर्वरित राज्यात मात्र तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.
दरम्यान मागच्या 24 तासांमध्ये राज्यात कोकण विभागात कुलाबा 230, सांताक्रूज 170, गुहागर, राजापूर, मालवण, लांजा प्रत्येकी 150. रामेश्वर 120, रत्नागिरी 110, मुरूड, वरण, वसई, सावंतवाडी प्रत्येकी 100, देवगड, श्रीवर्धन, ठाणे प्रत्येकी 90, दोडामार्ग 80, दापोली, पेण, संगमेश्वर, वैभववाडी प्रत्येकी विदर्भ : 70, तलासरी, तळा, पनवेल, रोहा प्रत्येकी 60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
हे ही वाचा : शिंदे सरकारचा आज पहिला 'पेपर', फडणवीसांच्या रणनीतीने सरकार होणार 'पास'?
मध्य महाराष्ट्र: गगनबावडा, लोणावळा प्रत्येकी 60 अक्कलकुवा, महाबळेश्वर प्रत्येकी 50, इगतपुरी, धरणगाव प्रत्येकी 40, पौड, वेल्हे, ओझरखेडा, पन्हाळा 30. मराठवाडा शिरूर अनंतपाळ 40, भोकर 30, लोहारा, आष्टी, हादगाव, माहूर, पाटोदा प्रत्येकी 20 मिमी पावसाची नोंद झाली.
जेवती, कुही, बल्लारपूर, सेलू, देवळी प्रत्येकी 40 मुलचेरा, लाखदूर, सिरोंचा, सिंदेवाही, कोरपणा, चंद्रपूर, हिंगणा, कामठी, भिवापूर, आरमोरी, मूल प्रत्येकी 30. घाटमाथा धारावी 280, शिरगाव, दावडी, खोपोली 70, डुंगुरवाडी, कोयना (पोफळी), भिरा प्रत्येकी 60.
कोकण किनारपट्टीवर जोरदार बरसणारा पाऊस, राज्यात मात्र कमजोर असल्याचे चित्र आहे. कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असला तरी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या अनेक भागांत पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. कोकणात जोरदार पावसाचा, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Monsoon, Weather, Weather forecast, Weather update, Weather warnings