नवी दिल्ली, 14 जून : सध्या शेतीत आधुनिकीकरनाला मोठ्या प्रमाणात चालणा देण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरू आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवण्याचे काम ही सुरू आहे. यामध्ये नुकतीच सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडृून ड्रोनच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात मोठा बदल घडवून आणण्याची तयारी सरकारकडून दर्शवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांची सोय होईल, अशी सरकारला आशा आहे.
सध्या शेतीला औषध फवारणीसाठी लागणारा अधिक वेळ वाचवण्यासाठी ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच मोठ्या पट्ट्याची शेती असेल तर ड्रोनने फवारणी करण्यासाठी सोयीचे होते. याचबरोबर शेतीचा खर्च कमी होऊन उत्पन्न वाढेल. सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्येक गावात सुमारे एका शेतकऱ्याकडे एक ड्रोन असायला हवा असे सरकारचे धोरण आहे.
ड्रोन खरेदीसाठी आर्थिक मदत
दरम्यान, केंद्रानेही ड्रोन खरेदीसाठी वैयक्तिकरित्या आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेत आहे. या योजनेचा लाभ अनुसूचित जाती, जमाती, अल्प व अल्पभूधारक शेतकरी, महिला आणि ईशान्येकडील राज्यांतील शेतकरी यांना मिळणार आहे. ड्रोन खरेदी करण्यासाठी खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल 5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तर इतर शेतकऱ्यांना 40 टक्के किंवा कमाल 4 लाख रुपयांची मदत मिळणार आहे.
फार्म मशिनरी ट्रेनिंग आणि टेस्टींग संस्था (FMTTI), भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) संस्था, कृषी विज्ञान केंद्रे आणि राज्य कृषी विद्यापीठांना ड्रोन खरेदीसाठी 100% दराने मदत दिली जाणार आहे. फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन (FPO) ला शेतात प्रशिक्षणासाठी ड्रोनच्या किमतीच्या 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज (दि.02) झालेल्या दिल्लीत 'प्रमोटिंग फार्मर ड्रोन: इश्यूज, चॅलेंजेस आणि वे अहेड' या विषयावरील परिषदेत ही माहिती दिली.
ड्रोन कृषी क्षेत्रात काय काम करेल
पीकांचे मुल्यमापन, जमिनीच्या नोंदींचे डिजिटायझेशन, कीटकनाशके आणि पोषक द्रव्ये फवारणीसाठी 'किसान ड्रोन'च्या वापराला सरकार प्रोत्साहन देत आहे, यासाठी केंद्राकडून बजेटमध्ये तरतूदही करण्यात आली आहे. देशातील कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण हा पंतप्रधान मोदींच्या अजेंड्यावर आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा लाभ मिळेल. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना परवडणारे व्हावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे तोमर म्हणाले.
टोळ पक्षांना ड्रोनद्वारे नियंत्रित करण्यात यश
केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी म्हणाले की, हे नवीन तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे त्यांची सोय होईल, खर्च कमी होईल आणि त्यांचे उत्पन्न वाढेल. टोळ पक्षांच्या हल्ल्यादरम्यान, सरकारने तातडीने ड्रोन आणि हेलिकॉप्टरचा बचावासाठी वापर केला होता. कृषी सचिव मनोज आहुजा म्हणाले की, ड्रोन शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी अनुकूल परिस्थिती असून सरकारही याबाबत कटिबद्ध आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.