मराठी बातम्या /बातम्या /agriculture /

Maharashtra Rain : राज्यात 'या' जिल्ह्यात पुढचे तीन दिवस अतिमहत्वाचे, मुसळधार पावसाने दैना उडणार

Maharashtra Rain : राज्यात 'या' जिल्ह्यात पुढचे तीन दिवस अतिमहत्वाचे, मुसळधार पावसाने दैना उडणार

हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात पुढील चार दिवस अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याचा अंदाज दिला आहे.

हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात पुढील चार दिवस अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याचा अंदाज दिला आहे.

हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात पुढील चार दिवस अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याचा अंदाज दिला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 04 ऑगस्ट : यंदा मान्सून लवकर सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता परंतु जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने हजेरी लावली. दरम्यान जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने दैना उडवत राज्यातील अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान पुन्हा पुढचे चार दिवस मुसळधार पावसाने दैना उडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, पुण्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिला आहे. (Maharashtra Rain)

कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. पण काल (दि. 03) पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. दरम्यान, हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात पुढील चार दिवस अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान येलो आणि ऑरेंट अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनाने यासंदर्भात सतर्क राहण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.

हे ही वाचा : 42 कोटी मंजूर असून जळगाव पालिकेचे आळशीपणा, अखेर लोक झाली आत्मनिर्भर, वर्गणीतून बनवला रस्ता

मात्र, कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात पावसाने उघडीप दिल्यामुळे उष्णतेत वाढ झाली होती. पण, आज सायंकाळ पासून विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार दिवस कोल्हापूर, सातारा सह घाट परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

जिल्ह्यातील राधानगरी धरणात 169.72 दलघमी पाणीसाठा असून धरणातून 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली गेला आहे.

हे ही वाचा : जमिनीच्या वादातून भावकीत मारामारी; कुऱ्हाडीने एकमेकांवर हल्ला, गोंदियातील धक्कादायक घटनेचा Video

केरळच्या अनेक भागात ४ ऑगस्टपर्यंत मुसळधार

केरळच्या अनेक भागात ४ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासाठी आयएमडीने ऑरेंज अलर्टही जारी केला आहे. मुसळधार ते अति मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, हवामान खात्याने आजही उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरसह अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली होती.

First published:

Tags: Kolhapur, Rain fall, Rain flood, Rain in kolhapur, Weather forecast