Home /News /agriculture /

Krushna and Panchganga River : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना यंदा Almatti Dam चा धोका कमी, राज्याच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटक सरकारला मनवलं

Krushna and Panchganga River : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना यंदा Almatti Dam चा धोका कमी, राज्याच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटक सरकारला मनवलं

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात 2005, 2019 आणि 2021 साली महापुरामुळे (FLOOD) अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले. (Kolhapur, sangli flood)

  कोल्हापूर, 27 मे : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात 2005, 2019 आणि 2021 साली महापुरामुळे (FLOOD) अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान या सगळ्याचे खापर कर्नाटक सरकारने बांधलेल्या अलमट्टी धरणावर (Almatti Dam) ढकलण्यात आले. यामुळे मागच्या तीन वर्षांपासून मान्सून (monsoon) सूरू होण्यापूर्वी राज्य सरकार अलमट्टीच्या पाण्याच्या नियंत्रणाबाबत नियोजन करत असते. (Water management) दरम्यान कृष्णा आणि पंचगंगा (Krushna and panchganga river) या नद्यांना कर्नाटकात पाणी तुंबल्याने मोठा फुगवटा तयार होतो.  दरम्यान याचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटकातील जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची (Officers of Water Resources Department in Maharashtra and Karnataka) पूरनियंत्रणाबाबत ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत अलमट्टी धरणातील पाणीपातळी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत नियंत्रित ठेवण्याचा निर्णय झाला.

  कृष्णा उपखोऱ्यातील नदीकाठावरील कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील पूरनियंत्रणासाठी अलमट्टीतील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातील जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची पूरनियंत्रणाबाबत ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत अलमट्टी धरणातील पाणीपातळी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत नियंत्रित ठेवण्याचा निर्णय झाला.

  हे ही वाचा : Sugarcane Farmer : 8 एकर ऊस तोडला जात नसल्याने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल

  ही बैठक जलसंपदा विभाग पुण्याचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत जीवित व वित्त हानी टाळून प्रभावी पूरनियंत्रणाच्या दृष्टीने कर्नाटक व महाराष्ट्रामध्ये दररोज जलशास्त्रीय माहितीची देवाण-घेवाण करण्याचे ठरले. विविध धरणांमधून उपखोऱ्यातील विसर्गाचे एकत्रित परिचालन करण्यात येणार आहे. पावसाळ्यामध्ये कृष्णाखोरे पूरनियंत्रण कक्ष, सांगली व अलमट्टी धरण व्यवस्थापन विभागामध्ये समन्वय साधण्यासाठी अनुभवी सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता यांची अलमट्टी धरणावर संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय झाला.

  जलसंपदा विभागामार्फत कृष्णा व भीमा खोऱ्यासाठी एककालिक आधार सामग्री अधिग्रहण प्रणाली अधिक सक्षम करण्यात आली आहे. या प्रणालीव्दारे पर्जन्यमान, जलाशयातील आवक, नदीची पाणी पातळी व विसर्ग यांची सध्यस्थिती व पुर्वानुमान उपलब्ध होते. या प्रणालीचा वापर अधिक सक्षमपणे करुन कृष्णा उपखोऱ्यातील सर्व यंत्रणामध्ये समन्वय साधून प्रभावी पूर नियंत्रण करता येईल, असा विश्वास मुख्य अभियंता हणमंत गुणाले यांनी यावेळी व्यक्त केला. अशा प्रणालीचा अवलंब कर्नाटक राज्यामध्ये देखील करण्यात येत असल्याचे मुख्य अभियंता एच. सुरेश यांनी या बैठकीत सांगितले.

  हे ही वाचा : Big Breaking : लडाखमध्ये 26 जवान प्रवास करणाऱ्या सैन्याच्या गाडीला जबर अपघात; आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू

  या बैठकीमध्ये राजापूर बंधाऱ्याच्या खालील बाजूस पाच किलोमीटर अंतरावर नदीपात्रात नवीन पूल बांधकामासाठी करण्यात आलेला कॉपरडॅम व अनुषंगिक भरावा काढून घेण्याबाबत अधीक्षक अभियंता मिलींद नाईक यांनी संबंधितांना सूचना करण्यास सुचविले. त्याबाबत अधीक्षक अभियंता डी. बसवराज यांनी सहमती दर्शवली.

  या बैठकीस कर्नाटक राज्याचे अलमट्टी धरण व्यवस्थापन विभागाचे मुख्य अभियंता एच. सुरेश, अधीक्षक अभियंता डी. बसवराज, सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता मिलींद नाईक, कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अशोक सुर्वे, सातारा पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहीत बांदवडेकर, कोयना सिंचन विभाग कोयनानगरचे कार्यकारी अभियंता नितेश पोतदार तसेच कोयना, वारणा, दुधगंगा, राधानगरी धरण व्यवस्थापन व सिंचन व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Kolhapur, Monsoon, Rain flood, Rain in kolhapur

  पुढील बातम्या